CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; 'मुंबई टेक वीक'ची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केली, त्यावेळी ते बोलत होते. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम ) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. “इंडिया : आय इन एक्शन ” या थीमअंतर्गत आयोजित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा , एंथ्रॉपिक , ओपेनाई , गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असेल.यावेळी मुंबई टेक वीक लोगोचे अनावरण करण्यात आले.


 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन ए आय चा विविध विभागांमध्ये वापर करत आहे,AI च्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत आहे. शासन या परिवर्तनात सर्वात मोठा भागधारक म्हणून सक्रिय भूमिका बजावत आहे.”मुंबई टेक वीकसारख्या व्यासपीठांमुळे AI संदर्भातील अनुभव लोकांपर्यंत अधिक व्यापक पातळीवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कार्यक्रमात शासनाच्या AI उपक्रमांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्याची सूचनाही केली.टीम च्या वाढत्या विस्ताराचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अधिकाधिक तरुण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक या उपक्रमाशी जोडले जात आहेत, ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्र शासन AI क्षेत्रातील नवोन्मेष आणि उद्योगवृद्धीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षापेक्षा अधिक भव्य आणि प्रभावी मुंबई टेक वीक आयोजित करूया आणि महाराष्ट्रातील युवकांना AI क्षेत्रातील नव्या संधींशी जोडून त्यांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध असेल.


मुंबई टेक वीक (MTW बाबत टीम चे सह-अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हर्ष जैन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि मुंबई टेक वीकच्या संकल्पनेवरील त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम ) तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, आयडीएफसी बँक यांच्या सहकार्याने आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे. “इंडिया : आय इन एक्शन ” या थीमअंतर्गत आयोजित मुंबई टेक वीक २०२६ मध्ये विविध क्षेत्रांतील ऐ आय च्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार असून मेटा , एंथ्रॉपिक , ओपेनाई , गूगल क्लाउड आणि नेसा यांसारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. एमटीयू २०२६ हे केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता उद्योगांचे स्वरूप कसे बदलत आहे आणि प्रत्यक्ष आर्थिक संधी कशा निर्माण करत आहे, हे दाखवण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि म्हणूनच मुंबई हे त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्र शासन आमचा भागीदार असल्याने, मुंबई आणि महाराष्ट्राच्या AI अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.


हर्ष जैन म्हणाले की, ए आय सादरीकरणांव्यतिरिक्त मुंबई टेक वीकमध्ये मध्ये ऐ एक्सीलेंस अवॉर्ड्स २०२६, अर्ली स्टेज स्टार्टअप शोकेस , ऐ आय आधारित जॉब फेयर यांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या जॉब फेअरमध्ये २५ हून अधिक कंपन्या भरती प्रक्रिया राबवणार असून ३०,००० हून अधिक उमेदवारांसाठी २५० पेक्षा अधिक रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मास्टरक्लासेस आणि स्टोरीज अनप्लग्ड सत्रांचे आयोजन होईल. मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुंबईभर १४ सॅटेलाईट इव्हेंट्स आयोजित करून परिसंस्थेतील अधिक व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.



टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) विषयी


टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) ही मुंबईच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला प्रोत्साहन आणि बळकटी देण्यासाठी कार्यरत असलेली स्वतंत्र, ना-नफा उद्योग संघटना आहे. हर्ष जैन (ड्रिम स्पोर्टस ), आकृत वैष (ऑक्टिवेट ), नैय्या सागी (ऐड्ट ), ध्रुविल संघवी (लॉगिनेक्स्ट ), आकांक्षा हजारी (लवलोकल ), विशाल गोंडल (गोकी ), मयंक कुमार (अपग्रेड ) आणि विवेक खेमानी (क्वांटिफी ) यांसारख्या उद्योग क्षेत्रातील नामवंत संस्थापक आणि नेत्यांचा गव्हर्निंग कौन्सिल या संघटनेचे नेतृत्व करतो. टिम विविध क्षेत्रांतील मुंबईस्थित अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. संस्थापक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांसोबत जवळून सहकार्य करत टीम मुंबईला भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान नवोन्मेष आणि आय आधारित उद्योगवृद्धीचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी कार्यरत आहे.


यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी,मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण) कौस्तुभ धवसे,टीम गव्हर्निंग कौन्सिलचे सह-अध्यक्ष संस्थापक आक्रित वैश, टीम गव्हर्निंग कौन्सिलचे सह-अध्यक्ष हर्ष जैन,संस्थापक प्रमुख, विपणन (मार्केटिंग), गव्हर्निंग कौन्सिल नैव्या साग्गी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी