Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या हलगर्जीपणा आणि वेळेत प्रतिबंधक कारवाई न केल्याने खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


माहितीनुसार निलंबितांमध्ये पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय ?


या प्रकरणाची सुरुवात झाली १ मे रोजी. बोदवड पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तक्रारीमध्ये गंभीर वाद निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. पुढे काही चुकीचे कृत्य गडू नये आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनही कोणतीही चौकशी किंवा कारवाईची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिक वाढत गेला आणि अखेर खुनासारखी गंभीर घटना घडली.


दरम्यान, सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ हे बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत होते. १९ मे रोजी ते दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकॉ मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले होते. संबंधित दोन्ही गटांतील वाढत्या वैमनस्याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी केवळ दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यामध्ये आणून कोणतीही कायदेशीर अथवा प्रतिबंधक कारवाई न करता सोडून दिले. या निष्काळजीपणामुळे २१ मे रोजी गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



या संपूर्ण प्रकरणात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरातील वादाची सविस्तर माहिती पोकॉ मोहन चौधरी यांनी त्यांना फोन तसेच व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. स्थानिक नगरसेवकाने देखील परिसरातील संवेदनशील परिस्थितीबाबत त्यांना सतर्क केले होते. मात्र, इतकी गंभीर माहिती मिळूनही त्यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या नाहीत.


तसेच वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नाही. परिणामी, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी