लातूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयने लातूरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी स्वतःच्या मुलासाठी परीक्षेपूर्वी फुटलेली नीट प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. (NEET Paper Leak Case)
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर पुणे ...
अमरावती : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता थेट विदर्भापर्यंत जाऊन पोहोचला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच ...
चौकशी सुरू असतानाच सीबीआयने शिरूरे यांच्याकडील मोबाईल जप्त केला. त्याने कुणाकुणाला संपर्क साधला होता. मोटेगावकरांशी कधीपासून संपर्कात होता आणि कुणा कुणाला नीटचे पेपर विकले का? किंवा व्हायरल केले का? याचा तपास सीबीआय करणार आहे. तसेच त्याच्या रुग्णालयातून सीबीायने महत्त्वाचे कागदपत्रेही जप्त केली आहे. सीबीआयकडून त्याचे बँक अकाऊंटही चेक केले जाणार आहेत. त्याने मोटेगावकरांशी आर्थिक व्यवहार केले होते का? केले होते तर कितीचे केले होते? याची माहिती सीबीआय गोळा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (NEET Paper Leak Case)





