Pune Bastian Club : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील 'बॅस्टियन' क्लबमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील नाईटलाइफ (Video Viral On Social Media) आणि पब संस्कृती पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडली आहे. मुंढवा (Mundhva) येथील उच्चभ्रू परिसरामध्ये असलेल्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी (Shilpa Shetty) संबंधित 'बॅस्टियन' (Bastian) क्लबमधील एक अत्यंत धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या क्लबमध्ये काही तरुण-तरुणींनी सर्वांसमक्ष अश्लील वर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.



नेमके काय घडले व्हिडिओमध्ये?




सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये क्लबमधील अत्यंत बेशिस्त आणि आक्षेपार्ह दृश्ये कैद झाली आहेत. क्लबमध्ये कानठळ्या बसवणारे संगीत सुरू असून तरुणाई मद्यधुंद अवस्थेत बेभान होऊन नाचत आहे. मात्र, याच गर्दीत मागच्या बाजूला असलेल्या सोफ्यावर काही तरुण-तरुणींचा गट चक्क अश्लील कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शेकडो लोकांची वर्दळ असतानाही आणि सार्वजनिक ठिकाण असतानाही या जोडप्यांना आजूबाजूच्या परिसराचे जराही भान नसल्याचे या व्हिडिओवरून उघड होत आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि एवढ्या गर्दीत चाललेल्या या ओंगळवाण्या प्रकारामुळे पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पालकांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. शहरातील तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन नेमक्या कोणत्या दिशेने चालली आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. क्लबमध्ये असे प्रकार राजरोसपणे सुरू असताना क्लब प्रशासनाचे याकडे लक्ष कसे गेले नाही, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी


मुंढवा येथील हा 'बॅस्टियन' क्लब वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विविध कारणांमुळे हा क्लब चर्चेत राहिला आहे. आताच्या या नव्या व्हिडिओमुळे पुण्यातील एकंदर नाईटलाइफवर आणि पबच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांवर या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात असून, पुणे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि संबंधित क्लबसह या प्रकारात सामील असलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुणेकरांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून