Tuesday, May 19, 2026

LSG VS RR : आज आपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध लखनऊमध्ये निर्णायक लढत, निकालाचा परिणाम पंजाबवर होणार..

LSG VS RR : आज आपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध लखनऊमध्ये निर्णायक लढत, निकालाचा परिणाम पंजाबवर होणार..

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये ६४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंटस यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानिसिंह स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. राजस्थानसाठी हा सामना डू ओर डाय आहे. जर राजस्थानचा या सामन्यात पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफ आव्हान संपुष्टात येईल आणि याचा थेट फायदा पंजाब किंग्सला होईल. मात्र राजस्थानला घरच्या मैदानवर या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही.

रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने आतापर्यंत १२ पैकी सहा सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह राजस्थान पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी २ सामने जिंकण्याची गरज आहे. दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनउ अपेक्षीतप्रमाणे कामगिरी करु शकली नसल्याने प्लेऑफ रेस मधून बाहेर झाली आहे. संघाने १२ पैकी फक्त चार सामने जिंकले आहे. त्यामुळे ते या सामन्यात फियरलेस क्रिकेट खेळताना दिसू शकतात. याचा थेट फायदा पंजाब किंग्सला होणार आहे. राजस्थानसाठी वैभव सुर्यवंशीने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२ सामन्यात ४८६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने १२ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊसाठी मिचेल मार्शने १२ सामन्यात ४६७ धावा केल्या आहेत. तो या हंगामात लखनऊसाठी सर्वधिक धावा करणार फलंदाज ठरला आहे. प्रिन्स यादवने लखनऊसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १२ सामन्यात १६ विकेट्स घेतले आहे.

हेड टू हेड

आयपीएल इतिहासात या दोंघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. यात राजस्थानने पाच आणि लखनउने दोन सामने जिंकले आहेत. या हंगामात इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने लखनऊचा पराभव केला होता.

निकालाचा परिणाम राजस्थानवर होणार ? पंजाब किंग्स सध्या १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सलग सहा सामन्यात पराभवाने पंजाब किंग्सला दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहवे लागत आहे. राजस्थानचा जर आज पराभव झाला, तर याचा थेट फायदा पंजाबला होणार आहे.

पीच रिपोर्ट

सवाई मानसिंहच्या खेळपट्टीवर नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळतो. बाउन्स आणि वेगवान आउटफिल्डमुळे फलंदाजांसाठी शॉट खेळणे सोपे होते.या मैदानावर आयपीएलमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 166 धावा राहिली आहे, तर दुसऱ्या डावात सरासरी 150-160 धावांच्या दरम्यान आहे. येथे आतापर्यंत आयपीएलचे 67 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 24 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 43 सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

संभाव्य प्लेइंग-XI

राजस्थान- यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, रवि सिंग, शुभम दुबे, दसुन शनाका, जोफ्रा आर्चर, बृजेश शर्मा आणि यश राज पूंजा. इम्पॅक्ट- शुभम दुबे.

लखनऊ- मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, एडन मार्करम, ऋषभ पंत, मुकुल चौधरी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, मयंक यादव आणि प्रिन्स यादव. इम्पॅक्ट- दिग्वेश सिंग राठी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा