मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून चौकशी

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अटकेनंतर, आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरू असून, तपासाची व्याप्ती आता मोटेगावकरच्या कुटुंबापर्यंत आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.


सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टनुसार, शिवराज मोटेगावकरने केवळ पैशांसाठीच नव्हे, तर नुकतीच १२ वीची परीक्षा दिलेल्या आपल्या स्वतःच्या मुलाला फायदा पोहोचवण्यासाठी या पेपरफुटीच्या जाळ्याचा वापर केला होता. मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच नीटची प्रश्नपत्रिका मिळवून ती उत्तरांसह आपल्या मुलापर्यंत पोहोचवली असल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. शिवराज मोटेगावकरचा मुलगा अल्पवयीन असल्याने चौकशीदरम्यान त्याच्यासोबत २ ते ३ वकीलही उपस्थित आहेत. पुण्यातील सीबीआय कार्यालयात या सर्व विद्यार्थी आणि पालकांसमोर विविध आर्थिक व तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.



मेडिकल कॉलेजचे स्वप्न


सूत्रांनुसार, मोटेगावकर आणि त्यांची पत्नी यांपैकी कोणीही एमबीबीएस डॉक्टर नाही. स्वतःचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी कुटुंबातील कोणीतरी वैद्यकीय क्षेत्रात असणे आवश्यक असल्याने, मुलाला डॉक्टर बनवून त्याच्या नावाने मोठे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मोटेगावकरची योजना होती. क्लासेसच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती कमावणारा मोटेगावकर सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या देखील रडारवर आहे.



चौकशीचे फर्मान


मोटेगावकरच्या मोबाईल आणि बँक खात्यांच्या तपासणीत अनेक महत्त्वाचे तांत्रिक व आर्थिक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. त्याच्या बँक खात्यात काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. या अनुषंगाने सीबीआयने आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या इतर ३ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही पुण्यात चौकशीसाठी बोलावले आहे. या विद्यार्थ्यांनाही मोटेगावकरकडून फुटलेला पेपर मिळाला असल्याचा संशय आहे.



प्राध्यापकांशी संधान


मोटेगावकरचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी निगडीत काही प्राध्यापक आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले आहे. पेपरफुटीचे हे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे याचा तपास सुरू असल्याने सीबीआयने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. देशभर गाजलेल्या या वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्यात आता सीबीआयच्या या नव्या कारवाईमुळे आणखी काही मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण