Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील गाड्यांवर करणे पसंत करतात. मात्र, तुमचीही अशी सवय असेल, तर ही बातमी तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी आहे. मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादर पूर्व रेल्वे स्थानक (Dadar Viral Video) परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि किळसवाणा प्रकार उजेडात आला आहे. येथील एका इडली विक्रेत्याने चविष्ट इडली बनवण्यासाठी चक्क सार्वजनिक रेल्वे शौचालयातील पाण्याचा वापर केल्याचा गंभीर आरोप होत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत असून, रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणाऱ्या मुंबईकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.



व्हिडिओमध्ये नेमके काय घडले ?




सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका जागरूक तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळते. एक तरुण इडली विक्रेत्याचा पाठलाग करत व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. तो विक्रेता हातात एक रिकामा पाण्याचा कॅन घेऊन थेट रेल्वे स्थानकाजवळील एका शौचालयात प्रवेश करतो. काही वेळातच तो शौचालयातील पाण्याने भरलेला ड्रम घेऊन बाहेर येतो आणि आपल्या इडलीच्या स्टॉलवर परततो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हेच दूषित पाणी तो इडलीचे पीठ बनवण्यासाठी आणि इतर कामांसाठी वापरताना स्पष्टपणे दिसत आहे.



हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ


दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे मुंबईतील सर्वात मोठे आणि मध्यवर्ती जंक्शन आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात, ज्यापैकी हजारो चाकरमानी स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांकडे नाश्ता करतात. इडली, मेदू वडा यांसारखे पदार्थ स्वस्त आणि सोयीचे असल्याने त्यांची मोठी विक्री होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि दर्जाचा बुरखा फाटला आहे. ग्राहकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे मुंबईतील 'अन्न सुरक्षेचा' (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी


जरी या व्हायरल व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी त्यातील दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या आणि स्वच्छतेचे साधे नियमही न पाळणाऱ्या फेरीवाल्यांची नियमित तपासणी मोहीम राबवणे आता काळाची गरज बनली आहे. अन्यथा, हा नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ असाच राजरोसपणे सुरू राहील.

Comments
Add Comment

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास