Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर माहिका शर्मा हिच्यासोबत २२ मे रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार, अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. मात्र या लग्नाबाबत हार्दिक किंवा माहिका यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चर्चांदरम्यान आता हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या देखील चर्चेत आला आहे. कृणाल भावाच्या लग्नाला उपस्थित राहणार की नाही ? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे.



दोन्ही भावांमध्ये तणावाच्या चर्चा


काही काळापासून हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. एका लीग सामन्यादरम्यान दोघांच्या वागण्यातून तणाव दिसल्याचेही काही चाहत्यांनी सांगितले. सामन्यानंतरही दोघांनी एकमेकांना भेट न देणे किंवा हस्तांदोलन न केल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले.


कृणाल लग्नाला गैरहजर राहणार?


हार्दिक आणि माहिका २२ मे २०२६ रोजी लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. पण त्याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. कृणाल सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे तो संघाचा सामना सोडून भावाच्या लग्नासाठी जाईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)