ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती


दोन्ही पक्षांची सुनावणी घेऊन नंतरच अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय


निर्माते अभिनेते मंगेश देसाई यांच्या प्रयत्नाला मिळाले यश


ठाणे :- मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. २६ वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या खाजगी विकासकाने या जमिनीचा टीडीआर आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.



आज सकाळी त्या ही मागणी घेऊन आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आल्या. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले. त्यांनी तत्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केले. त्यांनी उषा चव्हाण यांचे म्हणणे सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून, पुणे महानगरपालिकेने केलेला हा टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी. तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक तसेच पुणे मनपा यांची स्वतंत्र सुनावणी आपल्यासमोर घेण्यात यावी. यावेळी सर्व पक्षांनी आपापले म्हणणे आणि कागदपत्र सादर करावीत. सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केले.


यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिलेली असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. पुढील सुनावणी वेळी आपणही आपली सर्व कागदपत्रे सादर करावी त्यावेळी कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेऊ असे सांगून त्यांना आश्वस्त केले. यावेळी उषा चव्हाण यांनीही आपल्या प्रश्नाची तत्काळ दखल घेऊन दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले. स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचे काम आपल्याला माहित होते, त्यांचा वारसा आपण आणि आपले सहकारी चालवत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. आज त्यांच्याच आश्रमात आल्यावर आपण माझी तत्काळ दखल घेऊन दिलासा दिलात त्याबद्दल धन्यवाद दिले तसेच आपण या विषयात लक्ष घातल्याने आता या प्रकरणाला वेग येईल आणि मला आणि माझ्या मुलाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास उषा ताईंनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)