Congress : काँग्रेस नगरसेविकेसह ६ जणांवर अपहरणाचा गुन्हा

मुंबई : काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबावर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेची काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्याशी ओळख होती. त्यांच्यात कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांमुळे भेटीगाठी होत होत्या; मात्र सुरेश कोपरकर यांच्या घरच्यांना हा संबंध मंजूर नव्हता. ५ मे रोजी आशा कोपरकर यांच्या दोन्ही मुली, जावई आणि चालकाने महिलेचे घर गाठले. त्यांनी महिलेला घरातून बळजबरीने ओढत नेले आणि तिचे अपहरण केले.



तक्रारीनुसार महिलेला सुरेश कोपरकर यांच्या कार्यालयात नेण्यात आले. तिथे तिचे दोन्ही मोबाईल हिसकावून घेण्यात आले. तसेच महिलेच्या मदतीला आलेल्या एका तरुणालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. नगरसेविका आशा कोपरकर यांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच १४ मे रोजी महिलेला पुन्हा कार्यालयात बोलावले. तिची कार आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी बळजबरीने सह्या मागितल्या. अखेर जीवाला भीती असल्याने पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. भांडुप पोलिसांनी नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस निरीक्षक सविता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Comments
Add Comment

Lionel Messi FIFA World Cup 2026 : मेस्सीचा ‘महाविक्रम’ होणार? विश्वचषक जिंकल्यास रचणार नवा इतिहास

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना (Argentina) आणि स्पेन (Spain) हे दोन बलाढ्य संघ १९ जुलै

Nashik Crime News: नाशिक हादरले ! इंदिरानगर परिसरात तरुणीची निर्घृण हत्या

Nashik Crime News: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या वाढणाऱ्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये आधीच भीतीचे वातावरण पसरले

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Shashi Tharoor : लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर; १५ मिनिटांनंतर अग्निशमन दलाने केली सुटका

तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे खासदार (Congress MP) शशी थरूर (Shashi Tharoor) शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील (Kerala) एका हॉटेलच्या

Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक खालावली; पाटण्यातील रुग्णालयात दाखल

पाटणा : राष्ट्रीय जनता दल (RJD) चे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक

Rohit Sharma : ‘हिटमॅन’च्या निवृत्तीच्या बातम्यांना पूर्णविराम; लॉर्ड्स वनडेबाबत बीसीसीआयचा मोठा खुलासा

मुंबई : भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स (Lord's) येथे