Mumbai Pydhonie Family Death News : पायधुनी मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा; डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झिंक फॉस्फाइडमुळेच!

मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट करणारा अहवाल जेजे रुग्णालयाने मुंबई पोलिसांकडे सादर केला असून, या चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइड या विषारी रसायनामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. फॉरेन्सिक लॅब आणि जेजे रुग्णालयाच्या अहवालानंतर आता या प्रकरणातील पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


ही धक्कादायक घटना २५ एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील मोघल इमारतीत घडली होती. जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अब्दुल्ला डोकाडिया (४०), पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या १६ व १३ वर्षांच्या दोन मुलींचा यात मृत्यू झाला होता.



मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलच्या रात्री साधारण दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबाने काही नातेवाईकांसोबत जेवण केलं होतं. त्यानंतर नातेवाईक घरी गेल्यानंतर रात्री उशिरा, सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. काही वेळातच कुटुंबातील सर्व सदस्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांनी खाल्लेल्या अन्नपदार्थांचे तसेच कलिंगडाचे नमुने जप्त करून तपासासाठी पाठवले होते. मृतांच्या शरीरातील विविध नमुनेही तपासासाठी घेण्यात आले होते.



फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात मृतांच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळल्याचं स्पष्ट झालं. यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, पोटातील घटक, पित्त आणि शरीरातील मेदाच्या नमुन्यांमध्येही हे विषारी रसायन आढळून आलं. झिंक फॉस्फाइड हे अत्यंत घातक रासायनिक संयुग असून ते मुख्यतः उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी मारण्यासाठी वापरलं जातं. शेती आणि धान्य साठवणुकीमध्ये हे रसायन कीटकनाशक म्हणून वापरलं जातं.


दरम्यान, या प्रकरणात कलिंगडामुळे विषबाधा झाली का, याचाही तपास करण्यात आला होता. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कलिंगडाच्या सालीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. मात्र, त्या नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळून आली नसल्याची माहिती एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती. तसेच ही तपासणी विषबाधा झाली का हे शोधण्यासाठी नव्हती, तर भेसळीच्या अनुषंगाने करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा