US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

बीजिंग : जगातील दोन महासत्तांचे नेते, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमधील 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल' येथे अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय शिखर परिषद पार पडली. २०१७ नंतर या दोन नेत्यांची चीनमधील ही पहिलीच समोरासमोर भेट असून, जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. शी जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला. "तैवान हा चीन-अमेरिका संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे," असे नमूद करत त्यांनी सावध केले की, या विषयावर चुकीचे पाऊल पडल्यास दोन्ही देशांमध्ये संघर्ष किंवा चकमक उडू शकते, ज्यामुळे संपूर्ण द्विपक्षीय संबंध धोक्यात येतील. 'थुसिडाइड्स ट्रॅप' टाळून दोन्ही देशांनी सहकार्याचा नवा मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले.


होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणच्या अण्वस्त्र मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि टोलमुक्त व्यापारासाठी खुली राहिली पाहिजे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. इराणकडे कधीही अण्वस्त्रे असू नयेत, यावर अमेरिका आणि चीनचे एकमत झाले. चीनने अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून भविष्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील त्यांचे अवलंबित्व कमी होईल. ट्रम्प यांच्यासोबत एलॉन मस्क आणि टिम कूक यांसारखे अमेरिकेतील १५ हून अधिक बड्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. अमेरिकन व्यवसायांना चीनच्या बाजारपेठेत प्रवेश देणे आणि अमेरिकन उद्योगांमध्ये चिनी गुंतवणूक वाढवणे यावर चर्चा झाली. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे आणि चीनकडून अमेरिकन कृषी उत्पादनांची खरेदी वाढवणे यावरही भर देण्यात आला.


मैत्रीपूर्ण वातावरण आणि निमंत्रण : ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना "माझा मित्र" आणि "एक महान नेता" असे संबोधित करत ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी असल्याचे सांगितले. यावेळेस ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नीला २४ सप्टेंबर २०२६ रोजी व्हाईट हाऊस भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ