CSK IPL 2026 : सीएसकेला मोठा धक्का ! स्टार खेळाडू दुखापतीमुळे हंगामातून बाहेर..

CSK : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती. मात्र संघाने हळूहळू लय पकडली आहे. सीएसकेने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी संघाला उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकावे लागतील. या महत्त्वाच्या टप्प्यावर सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाद झाला आहे. तो उर्वरित सामने खेळण्याची शक्यता मावळली आहे. फ्रँचायजीने बुधवारी (१३ मे) रात्री सोशल मीडियावरून जाहीर केले की, अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन मांडीला दुखापत झाल्याने घरी रवाना झाला आहे. फ्रँचायझीने सांगितले की ओव्हरटन आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांमधून अधिकृतपणे वगळले आहे.



जेमी ओव्हरटनची कामगिरी


सीएसकेसाठी जेमी ओव्हरटन यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करत होता. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत ३६ धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या प्रयत्नांमुळे लखनऊला २०३ धावांवर रोखण्यात सीएसके यशस्वी झाली होती. धावांचा पाठलाग करताना सीएसकेने शेवटच्या षटकांत लक्ष्य पूर्ण केले. जेमी ओव्हरटनने यंदाच्या हंगामात सीएसकेसाठी १० सामन्यांमध्ये १७.७८ च्या सरासरीने गोलंदाजी करत १४ विकेट्स घेतल्या आहेत, तसेच १५२ च्या स्ट्राइक रेटने १३६ धावा केल्या आहेत.



सीएसकेची डोकेदुखी


सीएसकेचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातून बाहेर झाले आहेत. यंदाच्या हंगामात सीएसकेसाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी झाली आहे. नुकताच संघाने दुखापतग्रसत खेळाडू रामकृष्ण घोषच्या जागी कर्नाटकाच्या अष्टपैलू मॅकनील नोरोन्हा याला संघात सामील केले आहे. तसेच संघासाठी धोनीने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हंगामातून बाहेर झाला होता, आणि आता उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे ओव्हरटन बाहेर झाला आहे.



आयपीएल २०२६ मधून बाहेर झालेले सीएसकेचे खेळाडू-


नॅथन एलिस
खलील अहमद
आयुष म्हात्रे
रामकृष्ण घोष

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या