BMC : पहाटेच पोहोचल्या महापालिका आयुक्त सफाई कामगारांच्या भेटीला...

मुंबई :  असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी राहते. याच दृष्टिकोनातून मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावं. मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी तसेच कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या विविध पायाभूत सेवा सुविधा यांची यांना साजेशी स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे चित्र निर्माण व्हावे यासाठी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे आपलं लक्ष केंद्रित करू या विभागामार्फत अधिकाधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता राबवून घेणं आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे याला प्राधान्य दिलेले आहेत. यासाठीच स्वच्छतेची काम ही सकाळीच हाती घेतली जात असल्याने सकाळी उठून संबंधित अधिकाऱ्यांनाही सोबत घेत स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.



मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) स्थित कन्नमवार नगर स्वच्छता कामगारांच्या चौकीस बुधवारी सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला.


मुंबईतील रस्ते आणि त्याभोवतीचा परिसर, चौक स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कचरा साचणाऱ्या ठिकाणाचे समूळ उच्चाटन करावे. त्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करा, अशा सूचनाही भिडे यांनी दिल्या. आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांना आयुक्तांची संवाद साधल्याने एक प्रकारे त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण झाले.आणि आपण करत असलेल्या कामाची दखल खुद्द आयुक्त घेतात याचचाही एक प्रकारे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये एक आदरयुक्त भीती निर्माण झाली असून आता कामांमध्ये कोणतीही हयगय किंवा दुर्लक्ष करून चालणार नाही, तर काळजीपूर्वक काम केले पाहिजे याची पक्की खूणगाठ अधिकारी आणि कामगार यांनी मनाशी पक्की बांधल्याचे दिसून येत आहे.


या पाहणी प्रसंगी उप-आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप-आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप-आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

K.s.ramchandra    May 13, 2026 12:33 PM

Dear all A very good decesion.Respect working class Safai kamgar by giving them some appreciation Say Rs per shift of 1,2,3

Add Comment

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि