Narender Modi : पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलारांकडून 'कान्स' दौरा रद्द

 विभागाच्या बैठका आता ऑनलाइन; इंधन बचतीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा मोठा निर्णय


मुंबई : मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने प्रतिसाद दिला आहे. शेलार यांनी आपला प्रस्तावित 'कान्स' चित्रपट महोत्सव दौरा रद्द केला असून, आपल्या विभागासाठी इंधन बचतीचे तीन महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. "देशहितासाठी वैयक्तिक प्रलोभने बाजूला सारून शिस्त पाळणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे," असे प्रतिपादन शेलार यांनी यावेळी केले.


मंत्री आशिष शेलार यांनी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी सोमवारी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार, जागतिक चित्रपट महोत्सवासाठी (कान्स) विभागाकडून कोणतेही प्रतिनिधी मंडळ जाणार नाही. प्रवासावरील इंधन खर्च वाचवण्यासाठी उद्यापासून विभागाच्या सर्व बैठकी प्रत्यक्ष न होता केवळ ऑनलाइन स्वरूपात पार पडतील. सरकारी कामकाजासाठी इंधनावरील वाहने टाळून केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर केला जाईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.



राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर


पंतप्रधानांनी इंधन बचतीसह वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले, त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शेलार म्हणाले की, "राहुल गांधींचे विधान हे त्यांच्या अज्ञानाचा पुरावा आहे. जागतिक संकटाच्या काळात देशहितासाठी केलेल्या आवाहनावर राजकारण करणे दुर्दैवी आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी आयातीवर मर्यादा घालणे गरजेचे असताना त्यांना केवळ 'पोटदुखी' होत आहे."

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा