Khandala-Lonavala : खंडाळा-लोणावळा घाटातील ७० टक्के वाहतूक वळली 'मिसिंग लिंक'कडे

अवघ्या १० दिवसांत बोरघाटातील चित्र बदलले; वेळ आणि इंधनाची बचत करत 'सुसाट' प्रवास


मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) प्रवासातील सर्वात कठीण टप्पा समजला जाणारा बोरघाट आता वाहतूक कोंडीतून मुक्त झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या खंडाळा-लोणावळा घाटातील सुमारे ७० टक्के हलकी वाहतूक आता नवनिर्मित 'मिसिंग लिंक'कडे वळली आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मार्गामुळे घाटातील वाहनांच्या लांबच लांब रांगा गायब झाल्या असून मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला आहे.मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा 'विकेंड' म्हणजे बोरघाटात ५ ते ६ किलोमीटरच्या रांगा हे समीकरणच बनले होते. मात्र, 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यापासून हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्या केवळ ३० टक्के अवजड वाहने जुन्या घाट मार्गाचा वापर करत असल्याने लोणावळा-खंडाळ्यातील तीव्र वळणे आता मोकळा श्वास घेत आहेत.



मिसिंग लिंकमुळे प्रवासाचे एकूण अंतर ६ किलोमीटरने कमी झाले आहे. परिणामी, मुंबई ते पुणे या प्रवासातील २५ ते ३० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचत आहे. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे होणारी वाहतूक कोंडी आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. घाट उतरताना होणारे भीषण अपघात हा चिंतेचा विषय होता. नवीन मार्ग सुरक्षित असल्याने गेल्या १० दिवसांत या मार्गावर एकाही अपघाताची नोंद झालेली नाही. एक्स्प्रेस वे सहा पदरी असला, तरी ५.६८ किमीचा हा नवीन भाग आठ पदरी आहे. त्यामुळे वाहनांना अधिक वेग आणि मोकळी जागा मिळत आहे. घाटातील संथ वाहतुकीमुळे होणारा इंधनाचा अपव्यय बोगद्यातील प्रवासामुळे टळला आहे.

७ वर्षांच्या परिश्रमाचे फलित


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २०१९ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये खर्च करून सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. लोणावळा-खंडाळा शहरांना बायपास करून थेट बोगद्यातून नेणाऱ्या या मार्गामुळे प्रवाशांचे 'सुसाट' प्रवासाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत