मनस्विनी; पूर्णिमा शिंदे
व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आपल्यातील अंतरिक, बाह्यशक्ती, गुण समाविष्ट होतात. आपलं वागणं, बोलणं. इतकंच काय चालणं देखील. समाजामध्ये चार चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास हवा. आपली देहबोली, हावभाव, आंतरक्रिया महत्त्वाच्या ठरतात. सर्वात महत्त्वाचे आपली उच्चारण शक्ती. संवाद चातुर्य हे तितकेच महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाने एखादे वाक्य उच्चारण करणे. आपला मुद्दा, मत पटवून देणे तितकेच महत्त्वाचे असते. क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये संवाद चातुर्य, संभाषण कला आणि वक्तृत्व प्रभावीपणे गरजेचे असते. आपण सांगत असलेल्या माहितीतून इतरांच्या मनापर्यंत कसे पोहोचता येईल याकरिता मेहनत घ्यावी लागणारच. आत्मविश्वासाने आपला विचार पटवून देता आला पाहिजे. आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य, वक्तृत्व हा शब्दांचा खेळ नसून तो विचारांचा मेळ आहे. उत्तम वक्ता हा माणूस व समाज बांधत असतो आणि समाजाच्या संस्कृती परंपरांना उत्सव म्हणून साजरा करत असतो.
माणूस घडला तर इतिहास घडतो. माणूस बिघडला तर संस्कृती ढासळते. या संस्कृतीच्या सुवासिक शब्द फुलांची उधळण करणारी जीवन बाग म्हणजे वक्तृत्व. ही जीवन बाग फुलवताना वक्ते समाजाचे प्रबोधन करत असतात. समाजातून व्यक्तिमत्त्व घडवत असतात. आपल्या संवेदना, भावना, जाणिवा लेखणीतून मांडत असतात. शब्दातून व्यक्त होत असतात. आपल्या भाषेतून, शब्दातून समाजहित साधत असतात. कल्याण साधत असतात.
कॉर्पोरेट युगामध्ये नेट युगामध्ये सर्व स्तरावर आज प्रभावी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती व्यक्त करत असतानाचा आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, सभाधारिष्ट शब्दफेक, नजरकटाक्ष, या लकबी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. यामध्ये आवाजाची पट्टी, आवाजाचा पोत, आवाजात शक्ती असते. आवाजातील चढ-उतार, आवाजातील गोडवा महत्त्वाचा असतो. आपण आवाज उठवा म्हणतो तोच आवाज समोरच्याला ऐकावसा वाटेल असाच असला पाहिजे. कानठळ्या बसतील असा नसून त्या आवाजामध्ये गोडवा असावा. म्हणूनच तर नम्रता, विनयशीलता, मधुरता इत्यादी आवाजामध्ये निश्चित असावे. जन्मजात नसेल तर तो आवाज कमवावा. जसे शरीर कमावतो तसे आवाजही कमवावा लागतो. सगळ्यांनाच काही दैवी देणगी नसते. त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे.
स्तोत्र मोठ्याने बोलावी. पाढे, बाराखडी, पेपर वाचन करावे. तसेच दमछाक म्हणजे एका श्वासात मोठमोठी वाक्य मोठ्याने उच्चारावीत. काही जिभेचे, उच्चारण व्यायाम असतात ते करावेत. फुगा फुगवणे. ने स्ट्राने पाणी पिणे. पाण्याचा बुडबुडा हवेत सोडणे. जत्रेत खेळतात तसे. गमती जमतीची वाक्य मोठ मोठ्याने बोलणे. उदाहरणार्थ चटईला टाचणी टोचली. सरसकट सलगपणे २०-२० वेळा न चुकता बोलत राहणे. असे २५ पेक्षा अधिक अनेक वाक्य आहेत. आवाजाची किमया ही खूप न्यारी असते. ती एक वेगळी शक्ती आहे. आपला आवाज आपली ताकद बनू शकते. ओळख बनू शकते. त्यासाठी परिश्रम, कष्ट, सायास, सराव घेणे गरजेचे असते. खूप सारी लोकं तितके श्रम घेतातही. आमच्या आसमंत वाईस अॅकॅडमीमध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी हा तीन दिवसांमध्ये चांगला आवाज कमावतोच. उत्तम वक्ताही घडतो. त्याबरोबर भाषण शिकणे. सूत्रसंचालन, निवेदनशैली, संभाषण समोरच्याला आपल्या विचारांनी, शब्दांनी मंत्रमुग्ध करण्याची किमया सहज साधतात. पहिल्या दिवशी आपण अतिशय सुंदर रित्या सुविचार, अभंग ओव्या, छोटी छोटी वाक्य तयार करतो. कोडी सोडवतो. दुसऱ्या दिवशी आपण परिच्छेद लेखन, परिच्छेद वाचन आणि मांडणी करतो. ही मांडणी निबंध, भाषण आणि सादरीकरणाची असते. या सादरीकरणामध्ये आपण आपली भूमिका आणि जबाबदारी मांडत असतो. एका टोपलीत अनेक विषय असतात त्यातली एक चिठ्ठी विषयाची उचलून प्रत्येकाने आपापल्या परीने बोलण्याचा प्रयत्न करायचा. नसेल येत तर मार्गदर्शन योग्य पद्धतीने समजावून पटवून दिले जाते. तिसऱ्या दिवशी आपण दहा भाषणांची तयारी करतो. भाषण कसे करावे. उभे कसे राहावे? पासून ते हातातील माईक कसा पकडावा? हनुवटीपासून अंतर किती असावे? शब्दांचे उच्चारण कोणते? शब्द कसे उच्चारावे? अनावश्यक हालचाल टाळावी. काय करावे, कसे करावे आणि काय करू नये. हेही महत्त्वाचे. सादरीकरणात चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली आणि सभा धारिष्ट, आत्मविश्वास, अभ्यास, मांडणी, संदर्भासहित स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. गृहपाठातून पूर्णपणे तयारी व उजळणी करून घेतली जाते. सोबत नोट्स दिल्या जातात. वेगवेगळे वाक्य वेगवेगळ्या भावनेतून कसे मांडावे? उदा. त्या शब्दांची मधुरता, राग, करुणा, प्रेम, अर्जव, विनंती, तिरस्कार, द्वेष, अाक्रस्थळेपणा, उपरोधिकता या सगळ्या भावना एकाच वाक्याची १० वाक्यं वदवून घेतली जातात. सोबत अभ्यास असतो. परीक्षाही असते. दोन प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. एक लेखी आणि बोली आणि सर्टिफिकेट्स नोट्स प्रात्यक्षिक सहित संधी दिली जाते. काय वाचावे, कसे वाचावे, कोणते पुस्तक वाचल्यास आपल्याला जास्तीत जास्त उपयुक्तता होईल. त्याचे मार्गदर्शन देखील केले जाते. जीवनात वेळ नसेल तरी निश्चित थोडा वेळ काढून चार ते ९० वर्षांपर्यंत सर्व वयोगटातील सर्वांनी आसमंत वाईज अॅकॅडमीला निश्चित भेट द्या. कारण काळाची गरज, सध्या युगाची गरज. बोलले पाहिजे. व्यक्त व्हा, मुक्त व्हा! बिनधास्त भाषण शिका! तीन दिवसांत. या प्रशिक्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक विद्यार्थी घडले. शिक्षणाची अट नाही. स्पर्धा परीक्षा असो किंवा जीवनाच्या परीक्षा राजकारण असो किंवा कॉर्पोरेट सर्वच ठिकाणी उपयुक्त असे संभाषण संवाद साधण्यासाठी. व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा पाया भाषण हे आहे. पुढील भागात पाहणार सूत्रसंचालन व निवेदनशैली.






