Smartphone : कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा स्मार्टफोन

फक्त १० हजारांच्या आत नवा झेनो २००' स्मार्टफोन लाँच


मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी झेनो सीरिज आता आपला नवीन स्मार्टफोन झेनो २०० (ZENO 200) घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन खास अमेझॉनवर उपलब्ध असेल. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणाऱ्या डिझाइनसह आलेला झेनो २०० स्टाईल आणि मजबुतीचे भन्नाट कॉम्बिनेशन देतो.



या स्मार्टफोनमध्ये एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन सामान्य बजेट स्मार्टफोनपेक्षा अधिक मजबूत आहे. तसेच आयपी६५ रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासूनही फोन सुरक्षित राहतो.



झेनो २०० मध्ये आयटेलचा एआय असिस्टंट सोला देण्यात आला आहे, जो रोजच्या कामांना अधिक सोपे आणि जलद बनवतो. अल्ट्रालिंक फीचरमुळे नेटवर्क नसलेल्या भागातही कनेक्टिव्हिटी मिळते. हा स्मार्टफोन ४+८जीबी* रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह येतो. स्पेशल लॉन्च ऑफरमध्ये याची किंमत फक्त ९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध आहे.



आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, “झेनो सीरिज म्हणजे फक्त स्मार्टफोन नाही, तर तो एक स्टाईल स्टेटमेंट आहे. ट्रेंडी लूकसोबत मजबूत बिल्ड हवी असणाऱ्या जेन झी यूजर्सना लक्षात घेऊन हा फोन तयार करण्यात आला आहे. आयपी६५ रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनमुळे हा फोन आणखी खास बनतो. अल्ट्रालिंक आणि आयआर ब्लास्टरसारखे प्रीमियम फीचर्सही यात देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर मेमरीच्या किंमती वाढल्या असल्या तरी आम्ही हा फोन परवडणाऱ्या किंमतीत आणला आहे.”



झेनो २०० मध्ये ६.७५ इंचाचा १२० हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डीटीएस साउंड सपोर्टमुळे व्हिडिओ आणि म्युझिकचा अनुभव आणखी शानदार होतो. एआय असिस्टंट सोलामुळे समरी तयार करणे, डॉक्युमेंट मॅनेज करणे आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवणे सोपे होते. रायटिंग असिस्टंटद्वारे टेक्स्ट री-राइट करणे, स्पेलिंग आणि ग्रामर दुरुस्त करणे शक्य होते. एआय वॉलपेपर जनरेटरच्या मदतीने फोटो आणि टेक्स्टपासून स्टायलिश वॉलपेपरही तयार करता येतात.



डायनॅमिक बारमुळे बॅटरी, कॉल्स आणि नोटिफिकेशन अपडेट्स सहज पाहता येतात. कंपनीच्या मते हा फोन ४ वर्षांपर्यंत स्मूथ परफॉर्मन्स देईल. फोटोग्राफीसाठी १३ एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच आयआर ब्लास्टरमुळे टीव्ही, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही कंट्रोल करता येतात.


ऑक्टा-कोर युनिसोक टी७२५० प्रोसेसर आणि अँड्रॉइड १६ गोसह आलेला हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टिटास्किंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम अनुभव देतो. फेस अनलॉक आणि साईड फिंगरप्रिंट सेंसरची सुविधाही देण्यात आली आहे. ५००० एमएएचची मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन दिवसभर आरामात वापरता येतो. हा स्मार्टफोन कॉमेट ऑरेंज, मेटेओर टायटेनियम आणि नाइटली ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

Face Serum : सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड...तुमच्या त्वचेसाठी काय योग्य?

 सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड... यापैकी कोणते सीरम तेलकट त्वचेवर आणि कोणते कोरड्या त्वचेवर

Giloy : गुळवेल घरी कशी वाढवावी? सोपी पद्धत आणि योग्य काळजी

आजच्या काळात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. अशा अत्यंत

Home Decor Ideas : रिकाम्या बाल्कनीचा असा उपयोग करा; या ४ सोप्या DIY कल्पनांमुळे तुमचे घर अधिक सुंदर दिसेल

बाल्कनीच्या रेलिंगचा पुरेपूर उपयोग करण्याच्या पाच सोप्या घरगुती पद्धती खालीलप्रमाणे आहेत: अनेकदा आपण

Bollywood Movie : मिर्झापूर द मूव्हीच्या हाय-एनर्जी रॅप गाण्यात दिसणार का ढांडा न्योलीवाला?

टीझरला मिळालेल्या प्रचंड आणि जबरदस्त प्रतिसादानंतर आता "मिर्झापूर द मूव्ही" हा चित्रपट(Movie) ११ ऑगस्ट रोजी आपल्या

Airplane Accident : विमानाचा भीषण अपघात; पर्यटकांचे विमान शेतात कोसळून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू 

 पेरू देशात पर्यटकांचे विमान शेतात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला. दक्षिण

Malshej Ghat : माळशेज घाटात रस्ता खचला; मार्ग पूर्णपणे बंद! पर्यायी मार्गावर रात्रभर भीषण वाहतूक कोंडी

मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील प्रसिद्ध माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी