Team India new coach : गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, शेवटी...

भारतीय क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेच पण भारतीय संघाच्या कामगिरीत आणखी सुधावरणा व्हावी यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल हंगाम संपताच भारतीय टीमला नवा कोच मिळू शकतो. यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरु आहेत. भारतीय टीमला साईराज बहुतुले  Sairaj Bahutuleनवीन कोच म्हणून मिळण्याची दाट शक्यता आहे.



साईराज बहुतुले हे नेमके कोण आहेत?


साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) हे क्रिकेटविश्वात मोठे नावाजलेले नाव आहे. बहुतुले हे फिरकीपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी भारतातच नव्हेत तर जगभरात ओळखले जातात. स्पिन बॉलिंगमधील त्यांच्याकडे असणारे ज्ञान आजघडीला कोणत्याही अन्य कोचकडे नाही, असे म्हटले जाते. सध्या बहुतुले हे पंजाब किंग्स या संघाला प्रशिक्षण देत आहेत. साईराज बहुतुले यांनी भारतीय संघाकडून 2 कसोटी सामने खेळलेले आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार साईराज बहुतुले हा भारतीय संघात स्पिन गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून सामील होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर Gautam Gambhir हेच बहुतुले यांना संघात प्रशिक्षक म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गौतम गंभीर यांनी बीसीसीआयशी याबाबत चर्चा केली आहे.



भारतीय संघाकडे सध्या किती कोच ?


भारतीय संघाला प्रशिक्षण देणाऱ्या चमुमध्य गौतम गंभीर Gautam Gambhir हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून आहेत. त्यानंतर सिंताशू कोटक हे फलंदाजीचे कोच आहेत. मोर्ने मार्केल हे वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देतात. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना प्रशिक्षित करतात. भारताकडे फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नाही. त्यामुळेच बहुतुले हे लवकरच भारतीय संघात फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील होऊ शकतात. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव