World Thalassemia Day : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, महापौर आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केले रक्तदान

रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश


मुंबई (विशेष प्रतिनिधी )


जागतिक थॅलेसेमिया दिनाचे (World Thalassemia Day) औचित्य साधून, मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी शुक्रवारी ८ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात रक्तदान केले. शुक्रवारी सकाळी धारावी आणि परळ मध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध वैद्यकीय सेवा सुविधांचे लोकार्पण, त्यानंतर महानगरपालिका मुख्यालयात बैठका, दुपारी २.३० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत महानगरपालिका सभागृह, त्यानंतर कार्यालयीन कामकाज असा दिवसभराचा अत्यंत व्यस्त क्रम आटोपला, त्यानंतर महापौरांनी सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत थेट शीव रुग्णालय गाठले. जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून महापौर रितू तावडे आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनीही रक्तदान करून सर्वांसमोर कृतिशील उदाहरण ठेवले. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या कृतीतून थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना आवश्यक रक्तपुरवठ्याबाबत जनजागृतीस चालना मिळाली आहे. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख अंजली अमरापूरकर तसेच संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.



महापौर रितू तावडे यांचे आवाहन


रक्तदान केल्यानंतर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी मी दरवर्षी न चुकता रक्तदान करते. महापौर म्हणून कामकाजाची धावपळ वाढली आहे, राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या आपल्या जागी नक्कीच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना देखील विविध जबाबदाऱ्या असतातच. तरीही माणुसकीचे नाते जपण्यासाठी आपण सर्वांनी व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्ताची नितांत आणि नियमित गरज असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. मुंबईकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे मी या निमित्ताने विनम्र आवाहन करते.”

Comments
Add Comment

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती