Mumbai-Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर

Mumbai-Goa National Highway accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस प्रवासी उतरवण्यासाठी भरणेनाका येथे थांबली होती, दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने बसला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला.


या धडकेत कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कार मधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. जखमींना तात्काळ बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले. (Mumbai-Goa National Highway accident )


जखमींची नावे


अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (वय ५०), जनार्दन खेराडे (वय ४०), परशुराम गुणाजी खेराडे (वय ६०, सर्व रा. संगमेश्वर) तसेच अर्जुन धोंडीबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात (Walawalkar Hospital) हलविण्यात आले असून उपचार सुरु आहेत.


अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने खेड पोलिसांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे कामही हाती घेतले. (Mumbai-Goa National Highway accident )


वाहतुक कोंडी


दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर जवळपास अर्धा तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आणि स्थानिकांनी प्रयत्न करून वाहतूक पूर्ववत केली.


सिलेंडरचा टँक पुढील सीटवर


अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर गाडीतील सिलेंडरचा टँक पुढील सीटपर्यंत येऊन पोहोचला होता. सुदैवाने कोणतीही स्फोटक घटना घडली नाही; अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही

Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे

Ajit Doval : डोवाल यांच्या मार्गदर्शनात १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून गौरव

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रीय सुरक्षा

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; दान केलेले सोन्याचे अलंकार तुम्ही पाहिलेत का ?

 Shirdi :  शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे

POP Ganesh Idol Ban Decision 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी मिळण्याची शक्यता

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Shirdi : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; सुवर्णदानाचा मोठा वर्षाव ; तीन दिवसांत ७.८१ कोटींचं दान

Shirdi : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे