मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. उच्च न्यायालयाने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत खासगी कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने सरकारने आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.हे संपूर्ण प्रकरण १९४८ पासूनच्या जमिनीच्या नोंदींमधील गुंतागुंतीशी संबंधित आहे. मिरा भाईंदरमधील ही जमीन मूळची राज्य शासनाच्या मालकीची होती. प्रारंभी ही जमीन 'इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी' आणि नंतर 'मिरा सॉल्ट वर्क्स' यांना जमीन धारणाधिकार वर्ग-२ म्हणजेच केवळ वापरासाठी देण्यात आली होती. मात्र, या जमिनीच्या मालकी हक्काबाबत वर्ग-१ मध्ये बदल करताना कंपनीने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा सरकारचा दावा आहे. दरम्यान, १९५८ मध्ये या जमिनीचा वापर मिठागरांसाठी होत असल्याने त्यावर केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांचे (सॉल्ट विभाग) नाव लावले गेले होते.



जमिनीच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर वादात २५ मार्च १९९६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १८ नोव्हेंबर २००२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीअंती 'मिरा सॉल्ट वर्क्स'चा दावा फेटाळून लावत ही संपूर्ण जमीन महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निकालात केंद्र सरकारचे अपील फेटाळून लावत ही जमीन 'मिरा सॉल्ट वर्क्स'च्या मालकीची असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

राज्य सरकारसमोर पेच


विशेष म्हणजे, उच्च न्यायालयात हे अपील 'मेंटेनेबिलिटी' (कायदेशीर सुसंगतता) या तांत्रिक मुद्द्यावर अपेक्षित असताना, न्यायालयाने थेट गुणवत्तेवर (मेरीट) आधारित निकाल दिल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या निकालामुळे आता मूळच्या शासकीय जमिनीवर खासगी डेव्हलपर्सचे (मिरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स) नाव कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मौल्यवान जमीन खासगी बिल्डरांच्या घशात जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या