DC VS KKR : सलग चौथ्या विजयसाठी केकेआर सज्ज, दिल्लीसाठी करो या मरो चा सामना...

अरुण जेटली स्टेडियवर दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने


IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५१ वा सामना दिल्ली विरुद्ध केकेआर यांच्यात होणार आहे .हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ गुणवतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्तवाचा होणार आहे.


दिल्लीसाठी हा सामना करो या मरो चा होणार आहे. दिल्ली ने यंदाच्या हंगामात आता पर्यंत १० सामने खेळले आहेत. याच दिल्लीने सहा सामने गमवत फक्त चार सामने जिंकले आहेत. यामुळे दिल्ली गुणवतालिकेत सातव्या स्थानावर आहे . दुसरीकडे केकेआरने सलग तीन सामने जिंकत हंगामात पुनरागमन केले आहे. आतापर्यंत केकेआरने ९ सामन्यांत तीन जिंकले आहेत आणि पाच सामन्यांत त्याना पराभाव पतकरावा लागला आहे. केकेआर सात गुणांसह गुणवतालिकेत आठव्या स्थानावर आहे.


या हंगामात दिल्लीसाठी केएल राहुलने १० सामन्यांत सर्वाधिक ४४५ धावा केल्या आहेत.गोलंदाजीत कर्णधार अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली आहे . या हंगामात केकेआरचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. केकेआरसाठी अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक २६८ धावा केल्या आहे,आणि गोलंदाजीत सुनील नेरने ८ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत.



हेड टु हेड


आयपीएलमध्ये याआधी दिल्ली आणि केकेआर याच्यांत ३५ सामने झाले आहेत. यात केकेआरने दिल्लीला १९ वेळा पराभुत केले आहे ,तर दिल्लीला १४ सामन्यांत केकेआरला हरवण्यात यश आले आहे. २०२५ च्या हंगामातील दोनही सामन्यांत केकेआरने दिल्लीचा पराभव केला होता. यामुळे या सामन्यांत केकेआरच्या विजयाची शक्यता जास्त मानली जात आहे.


अरुण जेटली स्टेडियमवर खेळपट्टी कशी ?


अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी आयपीएलमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. सपाट खेळपट्टी आणि लहान बाउंड्री (60-66 मीटर) यामुळे येथे उच्च-स्कोअरिंग सामने होतात. मात्र, मागील दोन सामन्यांचे निकाल वेगळे राहिले आहेत.या खेळपट्टीवर आयपीएलचे १०१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४८ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तर ५२ वेळा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे टॉस हा निर्णायक ठरु शकतो.


संभाव्या प्लेइंग-11



दिल्ली कॅपिटल्स: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसांका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, टी नटराजन आणि समीर रिझवी.


कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि फिन ऍलन.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता