कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला आहे. बारावीच्या निकालातील यशाची परंपरा जपत, दहावीतही ९७.६२ टक्के निकालासह कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे.


फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राज्यातील नऊ मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली असली, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी (८८.४१ टक्के) लागला आहे. कोल्हापूर ९५.४७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी असून, मुंबई (९४.९७ टक्के) आणि पुणे (९४.२४ टक्के) यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे.


मुलींचे वर्चस्व कायम

यंदाही निकालात 'लेकी' सरस ठरल्या आहेत. परीक्षेला बसलेल्या ७ लाख २२ हजार ४५ मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८ लाख २० हजार ४२७ मुलांपैकी ८९.५६ टक्के मुले यशस्वी झाली. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.


विभागनिहाय निकाल


• कोकण : ९७.६२%
• कोल्हापूर : ९५.४७%
• मुंबई : ९४.९७%
• पुणे : ९४.२४%
• नाशिक : ९०.५३%
• अमरावती : ९०.५०%
• नागपूर : ८९.०७%
• लातूर : ८८.४२%
• छत्रपती संभाजीनगर : ८८.४१%


श्रेणीसुधारसाठी तीन संधी

ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मंडळाने 'श्रेणीसुधार/गुणसुधार' योजना उपलब्ध करून दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा आगामी तीन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी दिली जाणार आहे.दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर दिला. ते म्हणाले, "एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही केवळ पहिली पायरी आहे. ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता फेरपरीक्षेच्या संधीचा लाभ घ्यावा, शासन आपल्या पाठीशी आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण