मुंबई : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आता थेट जेलमध्ये जाणार? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. पण हे कोणत्याही पोलीस केसचं प्रकरण नाही. मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा मोठा धमाका होणार असून, सुनीता आहुजा आता चर्चित रिॲलिटी शो ‘लॉकअप २’मध्ये कैदी म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई : मनोज बाजपेयी यांच्या दमदार अभिनयाची आणखी एक झलक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्स प्रस्तुत ...
आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे सुनीता आहुजा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. गोविंदासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी अनेकदा खुलेपणाने भाष्य केलं, तर दुसरीकडे भाचा कृष्णा अभिषेकसोबत अनेक वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटवल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांमध्ये त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
आता याच सुनीता आहुजा एकता कपूरच्या सुपरहिट ‘लॉकअप २’मध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या सीझनप्रमाणे यंदाचाही सीझन प्रेक्षकांना भरपूर ड्रामा, भांडणं, भावना आणि धक्कादायक खुलासे देणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे यावेळी हा शो थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठी असल्याने अभिजात दर्जा लाभलेली मराठी भाषेतील सिनेसृष्टीला सिनेमांचे माहेरघर मानले जाते. ...
दरम्यान, या नव्या सीझनमध्ये कंगना रनौत पुन्हा जेलरच्या भूमिकेत दिसणार का, की तिच्या जागी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार एन्ट्री घेणार? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या चर्चांनी आधीच जोर धरला आहे.






