Nashik Crime News : नाशिकच्या जेलरोड (Jail Road) परिसरात हुंड्यासाठी होणारा छळ आणि पतीचे अनैतिक संबंध याला कंटाळून आशा प्रवीण घोटेकर या विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे.
संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कासारा दुमाला येथील रहिवासी गणेश गोपाळराव वाळके यांची बहीण आशा हिचा विवाह २००८ मध्ये दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर याच्याशी झाला होता. संसाराचे सुरुवातीचे काही वर्ष चांगले गेले मात्र २०१८ पासून आशा घोटेकर यांचा छळ सुरु झाला. पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून वारंवार आशा यांच्याकडून पैश्याची मागणी होऊ लागली. बहिणीचा संसार मोडू नये म्हणून आशा यांच्या भावाने आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना पैसे दिले होते. तसेच लग्नात 21 तोळे सोनेही देण्यात आले होते. मात्र, इतकी मोठी रक्कम आणि सोने देऊनही सासरच्यांची हाव संपत संपत नव्हती. (Nashik Crime News )
नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आलेली आहे. या अटकेनंतर बुधवारी ...
अनैतिक संबंध आणि जादूटोण्याची धमकी
तक्रारीनुसार, आशा यांना तिचे पती प्रवीण घोटेकर याचे अन्य एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याबाबत त्यांनी पाटील जाब विचारला असता, त्यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. इतकेच नव्हे तर सासरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच 'जादूटोणा करून तुला मारून टाकू,' अशी भीतीही त्यांना घातली. वारंवार होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे आशा या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. (Nashik Crime News )
मंत्रालयात हालचाली सुरू; अवैध मद्यपानावर आळा घालण्यासाठी विशेष नियोजन मद्य उत्पन्नात तब्बल १८ टक्क्यांची वाढ मुंबई : राज्यात मद्यावर आकारला जाणारा ...
त्रासाला कंटाळून जीवन संपवलं
बुधवारी (६ मे) सकाळी ७ च्या सुमारास आशा यांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सासरच्यांनी ही माहिती त्यांच्या माहेरच्यांना दिली. घाबरलेल्या आशा यांच्या नातेवाईकांनी तात्काळ नाशिकला धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच त्यांना बिटको रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले होते. आपल्या बहिणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप गणेश वाळके यांनी केला आहे.
गणेश वाळके यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) पती प्रवीण साहेबराव घोटेकर, साहेबराव सावळीराम घोटेकर (सासरे), लताबाई साहेबराव घोटेकर (सासू), राजेंद्र साहेबराव घोटेकर (दीर), चित्रा राजेंद्र घोटेकर (जाऊ) आणि आरती नयन गोसावी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापैकी पतीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




