IPL Punjab Kings : ऐन IPL मध्ये पंजाब किंग्सच्या 'या' खेळाडूच झालं निधन; म्हणून पंजाबच्या टीमने बांधली होती काळी फित

मुंबई : सध्या IPL २०२६ चा हंगाम जोरदार सुरु आहे. प्रत्येक टीम आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात जीव तोडून खेळताना दिसत आहेत आणि मॅच पाहायला प्रेक्षक वर्ग देखील स्टेडिअमवर प्रचंड गर्दी करत आहे. पण अशातच एका खेळाडूच्या आकस्मिक निधनाची दुखद बातमी समोर येत आहे. यावर युवराज सिंगने फोटो शेअर करत आपल्या भावना देखील मांडल्या आहेत.


आयपीएलमध्ये पंजाबकडून दोन सीजन खेळणाऱ्या अमनप्रीत सिंग याच वयाच्या ३६ व्या वर्षी आकस्मिक निधन झालं आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.




युवराज सिंगने केल्या भावना व्यक्त


अमनप्रीत सिंग गिल याच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. सुरुवातीच्या काळात आम्ही ड्रेसिंग रूममध्ये एकत्र होतो. तो एक शांत, मेहनती आणि खेळावर प्रेम करणार क्रिकेटपटू होता, त्याच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, 'ओम शांती', अशी पोस्ट युवराजने शेअर केली आहे.



अमनप्रीतची IPL मधील खेळी


पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अमनप्रीतने भारताकडून अंडर - १९ क्रिकेट खेळला तसेच विराट कोहलीसोबत बांगलादेश आणि श्रीलंकेविरोधात अंडर - १९ ट्राय सिरीजमध्ये अमनप्रीत खेळाला होता. अंडर - १९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अमनप्रीत सिंग गिल २००९-१० च्या आयपीएलमध्ये पंजाबच्या टीममध्ये होता. तसाच तो पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळाला ज्यात त्याने ६ सामन्यांमध्ये ११ विकेट घेतल्या होत्या. कामगिरीमध्ये सातत्य ठेवले नसल्याने अमनप्रीतच करिअर लवकर संपलं.



तसेच पंजाबने माजी खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करत त्याने अंडर १९, किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आणि पंजाबसारख्या टीमचं प्रतिनिधित्व केली, पंजाब क्रिकेटसाठी त्याने सर्वस्व दिल आणि पंजाब क्रिकेटची सेवा केली. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, अशी पोस्ट पंजाब क्रिकेट असोसिएशनने लिहिली. त्यामुळेच अमनप्रीतच्या निधनामुळे पंजाब किंग्सची टीम हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली होती.

Comments
Add Comment

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन

Asian Games : स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तेजस शिर्से आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

चेन्नई : महाराष्ट्राचा अडथळा शर्यतपटू (हर्डलर) आणि राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से याला 'स्ट्रेस फ्रॅक्चर'च्या

Arshdeep Singh : ‘सॉरी एश भाई...’; टॉप-5 गोलंदाजांची यादी सांगताना अर्शदीपने अश्विनची मागितली माफी, कारण ऐकून चाहत्यांनाही हसू आवरेना!

नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त