SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.



प्रकरण नेमकं काय ?


२ मे २०२६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत १०० प्रश्नांपैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केवळ एकाच पुस्तकातील इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न येणे हा निव्वळ योगायोग नसून, यात मोठा गैरप्रकार असल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर तीव्र आक्षेप घेत ती रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. (SRPF recruitment)


अखेर अप्पर पोलीस महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. "या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



एसआरपीएफनं काय म्हटलं ?


समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच. पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल. (SRPF recruitment)


त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. ही परीक्षा पूर्णपणे रद्द होऊन पुन्हा घेतली जाणार की केवळ संशयास्पद बाबींची दुरुस्ती केली जाणार, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना