Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला संपवल्याच्या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांचा संताप वाढत असताना पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे अन् खडानखडा माहिती गोळा केले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात (fast track court) हे प्रकरण चालवणार आहे. येत्या 10 दिवसात चार्जशीट दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. (Nasarapur Rape Case)



आरोपीला घटनास्थळी नेऊन तपास


दरम्यान, या प्रकरणातील आरोपी, नराधम भीमराव कांबळेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. या प्रकरणासंबंधित सखोल तपासासाठी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. यावेळी त्याने अनेक गोष्टींची कबुली दिली.घटनेच्यावेळी आरोपी कुठे उभा होता? त्याने नक्की कशाप्रकारे हा गुन्हा केला? या सर्व बारीकसारीक गोष्टींचा पंचनामा पोलिसांनी घटनास्थळी केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला अन् आरोपीला गोठ्यात नेलं होतं. (Nasarapur Rape Case)


चिमुकलीच्या छातीत जोरदार बुक्की मारली


या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, आरोपी भीमराव कांबळे बराच काळ गोठ्यातच थांबून होता. यावेळी त्याने मुलीचा जीव गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारली होती. पोलिसांकडून घटनास्थळी जाऊन केलेल्या तपासात हा हादरवणारा घटनाक्रम समोर आला आहे. (Nasarapur Rape Case)



पीडित कुटुंबाला शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू


नसरापूर येथे घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक असून, पीडित कुटुंबाला राज्य सरकारकडून शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘याबाबत संबंधित कुटुंबाने निवेदन दिले असून त्याची दखल घेत त्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसे त्या कुटुंबाला लेखी कळविण्यात आले आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्पर कारवाई करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी विशेष वकिलाची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत आरोपीस मृत्युदंड व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याबाबत प्रशासन कटिबद्ध आहे.’ असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या