Wednesday, May 6, 2026

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत संवेदनशील आणि उच्च सुरक्षा असलेल्या परिसरात हा स्फोट झाल्यामुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयास्पदरीत्या उभी असलेली एक स्कूटर अचानक जोरदार स्फोटाने उडाली. स्फोटाचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही, मात्र परिसरातील काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.

घातपाताचा कट ?

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसराला तात्काळ सील करण्यात आले असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामागचा दहशतवादी कट, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणताही हेतू नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

पोलिसांकडून तपासाला सुरुवात :

पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच संशयित हालचालींचा शोध घेण्यासाठी आसपासच्या परिसरात सखोल तपास मोहीम राबवण्यात येत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये :

दरम्यान, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments
Add Comment