BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना अथवा आवश्यक परवानगी न देता तात्काळ कामावरून कमी करण्यात आल्याच्या प्रकरणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.


आज विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कंपनी आस्थापना, कामगार संघटना तसेच कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कामगारांच्या सेवासमाप्तीची प्रक्रिया, नियमांचे पालन झाले की नाही, तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा मुद्दा यावर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान उपाध्यक्षांनी ११३ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्याबाबत सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.


कामगारांना कामगार कायद्यांनुसार पुन्हा सेवेत घेता येईल का, याबाबत कामगार विभागाने सखोल अभ्यास करून योग्य तो अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले.


संबंधित प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास करून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी लवकरच पुढील बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
यावेळी संबंधित सुरक्षारक्षक हे शुभम एचपी सिक्युरिटी कंपनी या कंपनीमार्फत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.


या प्रकरणातील अंतिम निर्णय अहवालानंतर घेतला जाणार असून, कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून