Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका पत्करू शकतात, अशीच एक घटना केरळम मधून समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मोठ्या भावाने दाखवलेल्या हिमतीचं कौतुक होत आहे.



नेमकं काय घडलं


घडलेली घटना केरळच्या मल्लापुरभागातील असून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. क्षणाचाही विलंब न करता मारलेल्या मिठीमुळे लहान भावाचे प्राण वाचले आहेत. तर झालं असं, घरात साफसफाईचे काम चालू होत. प्रत्येक जण कामात गुंतला होता, मोठा भाऊ खालची खोली साफ करत होता तर लहान भाऊ वरची खोली आणि गच्ची साफ करत होता. धाकटा गच्ची नीट साफ करतोय की नाही हे मोठा भाऊ खालून पाहत होता.







पण अचानक गच्चीत असलेल्या साबणाच्या पाण्यामुळे धाकट्या भावाचा पाय घसरला आणि तो गच्चीतून खाली कोसळला. खाली मोठा भाऊ उभा होता त्याने कशाचीच पर्वा न करता लहान भावाला झेलले आणि दोघेही खाली पडले. मोठ्याने झेलल्याने सुदैवाने कोणालाही काही लागले नाही.



भावांचे प्रेम


मोठ्या भावाने जर झेलले नसते तर तो सिमेंटच्या जमिनीवर आदळला असता त्याला गंभीर दुखापत झाली असती कदाचित डोक्याला मार लागला असता. हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Comments
Add Comment

Chardham Yatra News: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी बंद; उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई: चारधाम यात्रेकरूंच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. खराब हवामानामुळे चार धाम यात्रा दोन दिवसांकरिता

Maharashtra Sadan Delhi : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची दिमाखात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायाला निरोप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक

Central Railway : सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज; 418 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य

Noida Bus Fire : ‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’, शशांकने अखेरपर्यंत सोडली नाही आईची साथ; नोएडा बस दुर्घटनेतील शशांकची हृदयद्रावक कहाणी

Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर जेवरजवळ बुधवारी रात्री खासगी एसी स्लीपर बसला भीषण आग लागून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला.

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू, चार मजली इमारतीवरून उडी ; आश्रमात खळबळ

वृंदावन (उत्तर प्रदेश) : मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक कुमार उर्फ ‘रसिक दुलारी सरन’ यांचा

भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार? पोर्तुगालने UNSC मध्ये सुचवले महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताच्या सदस्यत्वाला पोर्तुगालकडून विशेष समर्थन मिळाले आहे.