Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता


मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नाणार प्रकल्प राजकारणाचा बळी ठरल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली. आज जर हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलली असती आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत १० वर्षे पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारतासह महाराष्ट्राला जागतिक पातळीवर अग्रेसर करण्यासाठी 'थोरियम'वर आधारित स्वदेशी 'एसएमआर' तंत्रज्ञान गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


एका खासगी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे महत्त्व, अणुऊर्जा प्रकल्पातील एसएमआर तंत्रज्ञान आणि थोरियमच्या विपुल साठ्यांचा देशासह महाराष्ट्राला होणारा फायदा यावर सविस्तर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या जागतिक 'जिओ-पॉलिटिकल' परिस्थितीत नाणार प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता. गुजरातमध्ये रिलायन्सच्या एका रिफायनरीने जसा संपूर्ण राज्याचा कायापालट केला, तशीच क्षमता नाणार प्रकल्पात होती. या प्रकल्पामुळे कृषी किंवा मासेमारीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसता; उलटपक्षी यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


जैतापूर प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानातील बदलांचा उल्लेख केला. आताच्या अद्ययावत एसएमआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एका प्रकल्पाचा करार केंद्र सरकारच्या प्राधिकरणासोबत, तर दुसऱ्या प्रकल्पाचा करार रशियाच्या रोसाटॉम कंपनीसोबत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे : सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे भारत आता स्वतःचे स्वदेशी एसएमआर विकसित करत असून, ते थोरियमवर आधारित असणार आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यास ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारताशी जगातली कोणतीही महासत्ता स्पर्धा करू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये यावर आधीच काम सुरू झाले असून, हा उपक्रम जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध

Nitesh Rane : फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार (फिश मार्केट) स्थापनेसाठी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त

Nitesh Rane : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

- सार्वजनिक कचरा पेट्या हटवून घरोघरी कचरा उचलण्यावर दिला जाणार भर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील कचरा