साप्ताहिक भविष्य, ३ मे २०२६ ते ९मे २०२६
![]() | धाडसी निर्णय घ्यालमेष : आपल्या राशीत अनुकूल ग्रह असल्याने हा कालावधी आपल्या शुभ जाणार आहे स्वतःचे व्यवसाय असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल आपली प्रगतीकडे उत्तम वाटचाल असणार आहे महत्त्वाची सरकारी कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक राहील. रखडलेली जमीन जुमल्या संबंधित असलेली कार्य पूर्ण होतील त्यातून भरघोस आर्थिक फायदा मिळू शकतो प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील मात्र सुरुवातीला सर्व व्यवहार काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे ठरेल कलाकारांना चांगल्या संधी मिळतील तरुणांना संधी येतील उत्तम प्रवास योग आहेत काही वादग्रस्त उधारी वसूल होईल या काळात आळस दूर ठेवून कामे वेळेवर करणे फायदेशीर ठरू शकते आपल्या साहस व पराक्रमामध्ये वृद्धी होऊन काही धाडसी निर्णय घ्याल शेअर्स सारख्या कारभारामध्ये फायदा होऊ शकतो मोठे निर्णय होतील घरातील वातावरण उत्साही व आनंददायक राहील |
![]() | महत्त्वाची कार्ये पूर्ण होतीलवृषभ : समाजातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होऊन भेटीगाठी होतील. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण होण्यासाठी या भेटीगाठी उपयोगी पडतील मध्यस्थी यशस्वी होतील. जमीन व स्थायी संपत्ती संबंधित असलेली रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील सर्वमान्य तोडगा निघेल भावंडांशी सख्य राहील लहान-मोठे गैरसमज दूर होतील .जवळ चे तसेस दूर चे प्रवास करावे लागतील. चांगल्या धनलाभाची शक्यता.नवीन संधी उपलब्ध होतील. चिंता मिटतील व्यावसायिकांना मोठे प्रतिष्ठित फायदे होतील. मंगल कार्यानिमित्त प्रवास घडतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांसाठी शुभ कालावधी. यश मिळेल |
![]() | नियोजन आवश्यक ठरेलमिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांच्या शिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडून येतील. खरेदी विक्रीतून चांगले लाभ.काही महत्त्वाचे सौदे होतील सरकार दरबारची कामे पूर्ण होताना दिसतील ओळखीतून चांगले लाभ आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवीन मार्ग शोधू शकाल मात्र त्यासाठी नियोजन आवश्यक ठरेल नवीन नवीन आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आपलं कार्यक्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहाल मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रातिल जातकांना मानसन्मानाचे योग आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण झालेला असेल |
![]() | प्रवासाचे योगकर्क : या कालावधीमध्ये आपल्याला शुभ ग्रहांचे चांगले पाठबळ राहणार आहे उत्तम उत्तम प्रवास घडू शकतात मात्र प्रवासात स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल तसेच भाजणी कापणे इत्यादी पासून सावध राहणे गरजेचे ठरेल वाहने सावकाश चालवा कोणतीही स्पर्धा नको नोकरीमध्ये हितच शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहणे गरजेचे ठरेल तसेच स्वतःच्या कार्याकडे लक्ष देणे हितकारक ठरेल. आपल्या ज्ञाना विषयी अद्यावत राहणे गरजेचे ठरेल.वरिष्ठांबरोबर वादविवाद टाळणे हितकारक ठरेल आपल्या कर्तुत्वात वृद्धी होताना दिसेल स्त्रियांना कार्यक्षेत्रात कामाचा ताण जाणवणार आहे. व्यर्थ वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल स्वतःच्या मताला मुरड घालावी लागेल.सामाजिक कार्यात सक्रिय रहाल. जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. आनंदी आणि उत्साही राहाल. नवीन उमेद मिळेल. विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. |
![]() | अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकतेसिंह : या आठवड्यात आपली चांगलीच आर्थिक प्रगती होणार आहे व्यवसाय मधील जुनी येणी वसूल झाल्यामुळे व्यावसायिक प्रगती होईल अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. व्यवसायात नवीन बदल केल्यामुळे व्यवसायावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल जमीन जुमला यांच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल नातेवाईक आप्तेष्ट व जुने मित्र यांच्या गाठीभेटी होऊ शकतात सामाजिक तसेच धार्मिक कार्यात भाग घ्याल कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य लाभल्यामुळे अनेक कामे मार्गी लावू शकाल .मनोरंजनाकडे कल असेल. सप्ताह मजेत जाईल.प्रवास होतील विद्यार्थी वर्गाला शुभ कालावधी |
![]() | जोडीदाराची साथ लाभेलकन्या : आत्तापर्यंत आलेला मनावरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल जोडीदाराची साथ लाभेल धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत मिळेल आपल्या जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वर्तनावर नियंत्रण आवश्यक.कोणाचाही अपमान करणे टाळा. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल.वडिलोपार्जित संपत्ती ची कामे गतीमान होतील मतभेद मिटतील. नोकरीत अनुकूल स्थिती निर्माण होईल मात्र आपण राजकारण व गटबाजी पासून दूर राहा मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद टाळा प्रवास घडतील. प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.अडलेली कामे पूर्ण होतील.धंनलभाचे योग |
![]() | अतिआत्मविश्वास नको.तूळ : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे गतीमान होतील. सरकारी कामात लागणारा विलंब नाहीसा होईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. व्यवसायिकांनी सरकारी कायदे व नियम कसोशीने पाळायला हवेत. आर्थिक दृष्ट्या प्रगति होईल काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक अतिआत्मविश्वास नको. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जीवनसाथी बरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील. घरातील वातावरण आनंद देईल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. नोकरीतील परिस्थिती अनुकूल राहील |
![]() | यशाचे प्रमाण वाढते राहीलवृश्चिक : अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकाल यशाचे प्रमाण वाढते राहील नोकरीत आपल्याला नवीन अधिकार मिळेल. पदोन्नती आणि वेतन वृद्धि चे योग आहे त. सामाजिक मानसन्मानात वाढ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. एखाद्या समारंभात मानाचे पद मिळेल आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहील. प्रेमामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा घडून देव दर्शन होईल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी खर्चही करावा लागेल.आरोग्या कडे लक्ष ठेवा.विवाह ठरतील |
![]() | नवीन जबाबदार्या स्वीकाराव्या लागतीलधनु : या सप्ताहात आपल्याला भाग्याची साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे होतील पर्यटन किंवा कामानिमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास घडू शकतात प्रवास कार्य सिद्ध होतील. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो. पदोन्नती तसेच वेतन वृद्धि होईल. मात्र नवीन जबाबदार्या स्वीकाराव्या लागतील. त्याच प्रमाणे बदलीची तयारी ठेवा. आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल रागावर नियंत्रण आवश्यक कुटुंबातील मुलांच्या विषयी सकारात्मक राहा. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील जुनी येणे वसूल होतील. मात्र भागीदारी व्यवसायात भागीदाराची मतभेद होऊ शकतात ते टाळा |
![]() | सरकारी स्वरूपाची कामे होतीलमकर : आपल्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे होतील विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे. मात्र आजचे काम आजच करा कामामध्ये विलंब नको. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल वरिष्ठांना बरोबर असलेले संबंध सुधारतील तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल जमीन जुमला व स्थानी संपत्ती विषयी चे व्यवहार गतीमान होतील. मध्यस्ती फलद्रूप होतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.आपल्या मतास प्राधान्य मिळेल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. मात्र अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका वेळेचे नियोजन उपयोगी पडेल |
![]() | अपेक्षित सहकार्य लाभेलकुंभ : कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. व्यवसायिक बद्दल फायदेशीर ठरतील. नवीन तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. प्रवासाचे योग सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींच्या समवेत लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राजकारणी जातकांना विरोध झेलावा लागेल विरोधक आक्रमक बनू शकतात |
![]() | संमिश्र फळे मिळण्याची शक्यतामीन : संमिश्र ग्रहमान यामुळे आपल्याला संमिश्र फळे मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीला कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात त्याचप्रमाणे धावपळ आणि दगदग होईल स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य करावे मात्र स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती सुधारेल व्यवसायिक उलाढाल वाढून फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल जमीन-जुमला यांची कामे गतिमान होऊ शकतात. सरकारी नोकरीत प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल.वाहन चालविताना दक्ष रहा.वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक राहील |











