Oil Barrels : अमेरिकन नौदलाला चकवा देत इराणचे जहाज १.९ मिलियन बॅरल तेलासह यशस्वीपणे बाहेर

तेहरान  :  समुद्रात अमेरिका आणि इराण यांच्यात एक मोठा लपंडाव सुरू आहे. एका ताज्या अहवालामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. मॉनिटरिंग फर्म ‘टँकरट्रॅकर्सडॉटकॉम’ने दावा केला आहे की इराणचे एक प्रचंड तेलवाहू जहाज अमेरिकन नौदलाच्या कडक नाकेबंदीला चकवा देत बाहेर पडला आहे. हे जहाज आता आशिया-प्रशांत प्रदेशात पोहोचले आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या समुद्री सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समुद्रात दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.



अमेरिकेने इराणला आर्थिक फटका देण्यासाठी त्याच्या तेल व्यापारावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अमेरिकन नौदलाने समुद्रात कडक नाकेबंदी केली आहे. मात्र, या ट्रॅकिंग फर्मच्या अहवालानुसार इराणचे एक विशाल जहाज ही नाकेबंदी भेदण्यात यशस्वी ठरले आहे. हे जहाज लाखो बॅरल कच्चे तेल घेऊन प्रवास करत आहे. या घटनेतून इराण आपले तेल विकण्यासाठी नवीन आणि गुप्त मार्ग शोधत असल्याचे स्पष्ट होते. फर्मच्या माहितीनुसार, या जहाजावर सुमारे १.९ मिलियन बॅरल कच्चे तेल आहे, ज्याची किंमत अंदाजे २२० दशलक्ष डॉलर आहे.हे विशाल जहाज (वेरी लार्ज क्रूड कॅरियर - व्हीएलसीसी) ‘नॅशनल इराणियन टँकर कंपनी’शी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या जहाजाची ओळख “ह्यूज” या नावाने करण्यात आली आहे.


अहवालानुसार, हे जहाज सुमारे दीड आठवड्यापूर्वी श्रीलंकेजवळील समुद्री भागात शेवटचे दिसले होते. सध्या हा तेलवाहू टँकर लोम्बोक सामुद्रधुनीमार्गे रिओ आर्किपेलागो (द्वीपसमूह) दिशेने पुढे जात आहे. १३ एप्रिल रोजी अमेरिकन नौदलाने नाकेबंदी जाहीर केली, तेव्हा हा टँकर इराणच्या जलक्षेत्रात होता. २० मार्च रोजी स्ट्रेट ऑफ मलक्का मार्गे इराणकडे रवाना झाल्यानंतर या जहाजाने आपला ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS) बंद केला होता, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले.



इराणच्या सरकारी माध्यमांनी २९ एप्रिल रोजी दावा केला होता की त्यांच्या किमान ५२ जहाजांनी अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की नाकेबंदी सुरू झाल्यापासून त्यांनी इराणशी संबंधित सुमारे ४१ जहाजांना परत जाण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेच्या मते ही नाकेबंदी प्रभावी ठरत असून त्यामुळे इराणला तेल निर्यात करण्यात अडचणी येत आहेत आणि त्याला तेल साठवणे किंवा उत्पादन कमी करणे भाग पडू शकते.


शनिवारी एका वृत्तसंस्थेने काही अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, अमेरिकेच्या या समुद्री नाकेबंदीमुळे इराणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग ‘पेंटागॉन’च्या अंदाजानुसार, या नाकेबंदीमुळे इराणला सुमारे ४.८ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. भारतीय चलनात हा तोटा सुमारे ४५६ अब्ज रुपये (४५,६०० कोटी रुपये) इतका आहे.

Comments
Add Comment

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

Nepal Agniveer Recruitment Rally : ‘आम्हालाही भारतीय सैन्यात भरती करा!’ अग्निवीर योजनेसाठी नेपाळचे हजारो तरुण रस्त्यावर

काठमांडू : भारतात अग्निवीर योजनेअंतर्गत तरुणांची भरती सुरू असताना नेपाळमध्ये मात्र याच योजनेत सहभागी