Sunday, May 3, 2026

Delhi Judge : दिल्लीत न्यायाधीशाची आत्महत्या, कारण आलं समोर

Delhi Judge : दिल्लीत न्यायाधीशाची आत्महत्या, कारण आलं समोर

नवी दिल्ली : सर्वांना न्याय देणारे न्यायायाधीशच मनाने खचले आणिआत्महत्या केली. दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. न्यायालयाचे न्यायाधीश असून देखील त्यांना आपल्या अडचणीत बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग सापडला नाही म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असे समोर येत आहे.

मूळचे राजस्थानचे रहिवासी

न्यायाधीश अमन शर्मा हे मूळचे राजस्थान अलमेरचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ, मुलगी, पत्नी असे कुटुंब आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुण्यात लॉ चे शिक्षण पूर्ण केले अन् दिल्ल्लीत 2021 मध्ये न्यायिक सेवेत रुजू झाले. . गुन्हेगारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकरणांत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी ना कोणती चिट्ठी सापडली, ना कोणता पुरावा, फक्त वडिलांना आत्महत्या करण्यापूर्वी एक शेवटचा कॉल केला होता.

शेवटचा कॉल वडिलांना

शुक्रवारी १ मे ला रात्री आमचे वडील प्रेम प्रकाश यांना अमनचा शेवटचा कॉल आल होता त्यात अमनने सांगितले की 'हा त्याचा शेवटचा कॉल आहे आणि त्याला जगायचे नाही, आयुष्य जगणं अशक्य होत चाललं आहे', हे ऐकून वडील तातडीने दिल्लीकडे रवाना झाला.

अमनचा न्यायाधीश पत्नी कडून छळ व्हायचा

अमनने काही वर्षांपूर्वीचा लव्ह मॅरेज केले होते. त्याला नऊ महिन्यांची मुलगी देखील होती. अमनच्या बायकोचे त्याच्या घरातल्यांशी फारसे पटत नव्हते त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. अमनची बायको सतत वडिलांचा अपमान करायची, त्यांना घालून पाडून बोलायची हे अमनला सहन होत नव्हते. त्यांच्या घरात अमनच्या बायकोची बहीण देखील राहायची. ती अमन च्या बायकोला भडकवायची त्यामुळे घरात भांडण होत होती. दोघांमधले वाद वाढत जात होते. बायकोचा अमनवर कायम दबाव असायचा हे अमनला सहन होत नव्हते.

बाथरूममध्ये घेतला गळफास

अमनने राहत्या घरी बाथरूममध्ये मफलरने गळफास लावला. अमनने आत्महत्या करताच त्याची बायको लहान मुलीला घेऊन माहेरी निघून गेली.

दोषींना शिक्षा व्हायलाच हवी

अमनने तो दबावाखाली वावरत असल्याचे वडिलांना कधी कळू दिले नव्हते. कायम संयमी आणि शांत मुलगा म्हणून तो वडिलांसमोर वावरत होता. कायम संयमी आणि शांत दिसणारा अमन नेहमी आनंदी दिसायचा. तो सर्वांचा आदर करणारा मुलगा होता. अमनच्या जाण्याने वडिलांना धक्का बसला आहे. माझ्या मुलाला त्रास देणाऱ्या त्याच्या बायकोवर आणि तिच्या बहिणीवर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी अमनच्या वडिलांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >