बारावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?, मुलींचे वर्चस्व कायम

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात नाशिक विभागाने ९०.७२ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विभागाच्या निकालात ०.५९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.


नाशिक विभाग चौथ्या क्रमांकावर


शनिवार (दि. २) रोजी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागातून एकूण १,६२,९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६१,८१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १,४६,७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९३.४२ टक्के तर मुलांचे ८८.४० टक्के इतके आहे.


एकूण २४,१७५ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ५३,६१३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १२,१९० विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे.


नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १८,४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७,२२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहराचा एकूण निकाल ९३.४० टक्के आहे. येथेही मुलींनी (९५.३१ टक्के) मुलांपेक्षा (९१.५७ टक्के) सरस कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery 2026 : अखेर प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या घरांची सोडत 6 ऑगस्टला; 2,640 घरांसाठी 75 हजार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या

BMC News : मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्तीत सहायक अभियंता, परवाना निरिक्षकांची मानसिकता कुठे?

सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरणार? अल निनोचा प्रभाव वाढणार; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र

Analog Paneer Ban : राज्यात 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभर बंदी; FDAचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Yemen attack : येमेनजवळ भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 13 भारतीयांसह सर्व 14 खलाशी सुखरूप

येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट