HSC Result 2026 : बारावी निकाल २०२६ जाहीर! राज्यात ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज (२ मे २०२६) दुपारी १ वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या निकालात सुमारे २.९ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा कोकण विभागाने आणि विद्यार्थिनींनी निकालात बाजी मारली आहे. (HSC Result 2026)



राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ३३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.



विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :


- कोकण विभाग – सर्वाधिक ९४.१४%
- लातूर विभाग – सर्वात कमी ८४.१४%


पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५०,३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ३६.४४% इतका आहे. (HSC Result 2026)



विद्यार्थी आपला निकाल या अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात –


- mahresult.nic.in
- mahahsscboard.in



निकाल पाहण्याची प्रक्रिया:


- विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर जाऊन “HSC Examination March 2026 Result” या लिंकवर क्लिक करावे,
- त्यानंतर रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून निकाल पाहता येईल.
- स्क्रीनवर दिसणारी गुणपत्रिका डाउनलोड करून प्रिंट घेता येईल. (HSC Result 2026) 

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी