BMC News : प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश


मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबईत अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने स्वच्छताविषयक कार्यवाही होणे गरजेचे आहे. सर्वत्र स्वच्छता दृश्यमान स्वरूपात प्रतिबिंबित व्हायला हवी. या अनुषंगाने, नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट) संकलन योग्यप्रकारे करावे. यासाठी प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा तयार करावा. स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ आणि ‘मुंबई क्लीन लीग’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी दिले आहेत.


पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील स्वच्छताविषयक कामकाजासंदर्भात ‘एम पश्चिम’ आणि ‘एच पश्चिम‘ विभाग कार्यालयात गुरुवारी ३० एप्रिल २०२६ रोजी आढावा बैठक पार पडली. यावेळी जोशी बोलत होत्या.


उपायुक्त (परिमंडळ-४) भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ-३) विश्वास मोटे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे, उपायुक्त (परिमंडळ-५) संध्या नांदेडकर, उपायुक्त (परिमंडळ-७) मनीष वळंजू, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध प्रशासकीय (वॉर्ड) विभागांचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.



यावेळी, पश्चिम उपनगरातील विविध प्रशासकीय विभागांतील स्वच्छताविषयक सद्यस्थिती तसेच बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट), कचरा संकलन आणि अनुशेष, विशेष काळजीयोग्य कचरा, यांत्रिक पद्धतीने केली जाणारी स्वच्छता, कचरा संकलन वाहने आणि मनुष्यबळाची सद्यस्थिती आदी बाबींचा सविस्तर आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे घेण्यात आला.


दरम्यान, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम व पाडकाम राडारोडा (सी अँड डी वेस्ट) संकलन योग्यप्रकारे करावे. यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा तयार करावा. त्यामध्ये, बांधकाम व पाडकाम राडारोडा टाकली जाणारी अनधिकृत ठिकाणे, त्यावर टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याचे प्रमाण आणि त्याची सद्यस्थिती याची इत्यंभूत माहिती समाविष्ट करावी.


/bmc-news-165-assistant-engineer-of-mumbai-municipal-corporation-become-executive-engineer-proposal-approved-in-the-house/


तसेच, सकाळच्या सत्रात स्वच्छता करण्यासाठी पूर्णतः घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत कार्यरत महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. नंतरच्या सत्रासाठी रस्ते स्वच्छता योजना किंवा पिंक आर्मीचा वापर करावा. परंतु , स्वच्छता राखली जात असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पर्यवेक्षण देखील तितक्याच जबाबदारीने व्हायला हवे. यासाठी, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व कार्यकारी अभियंता यांनी नियमितपणे प्रत्यक्ष क्षेत्र भेटी द्याव्यात. यांत्रिकी पद्धतीने केली जाणारी स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दीर्घकाळ रजेवर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश देखील जोशी यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Special Bus Service : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा; महाड-माणगाव-पोलादपूरसाठी विशेष बससेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

Mumbai - Pune Missing Link : मुंबई - पुणे मिसिंग लिंक बंद राहणार, काय आहे कारण ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकचा मुंबई - पुणे मार्ग दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल या

Mangal Prabhat Lodha : '‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्यावा; गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा'

मुंबई : मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे व सजावट ‘ड्रग्स

Tejasvi Ghosalkar : मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ राखीव डबे हवेत; भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेता, एक मोठा

Chandrakant Patil : 'राज्यातील विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे'

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27