नाशिक : लग्नाचे आमिष आणि फोटोंचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार

त्र्यंबकेश्वर : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एजाज पठाण (रा. इंदिरानगर, नाशिक) या संशयित आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ( Trimbakeshwar Crime News )


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , ही घटना ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत घडली आहे. खंबाळे परिसरातील दोन हॉटेलमध्ये नेऊन पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संशयित आरोपीने पीडितेचे कपडे बदलतानाचे फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल केले. तसेच “फोटो व्हायरल करीन” अशी धमकी देत वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ( Trimbakeshwar Crime News )


याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४(१), ६४(२)(m), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खैरनार पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य