Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका हॉटेलमध्ये मुक्कामास असताना अतिशय नीच कृत्य केले आहे. या खेळाडूंनी त्याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काही महिला डॉक्टरांचे बाथरूममध्ये अंघोळ करत असतानाचे अश्लील व्हिडीओ गुपचूप कॅमेऱ्यात कैद केले. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच संबंधित खेळाडूंवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असता, या दोन्ही आरोपी खेळाडूंची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या अत्यंत लज्जास्पद घटनेमुळे क्रिकेट विश्वाला मोठा कलंक लागला असून, या खेळाडूंच्या कृत्याबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



नेमकं प्रकरण काय ?


श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील (U-19) संघातील दोन क्रिकेटपटूंच्या लज्जास्पद कृत्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजधानी कोलंबोच्या 'नाराहेनपिता' भागातील एका खासगी हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका बिझनेस मिटिंगसाठी या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या महिला डॉक्टर बाथरूममध्ये असताना, या खेळाडूंनी भिंतीच्या फटी आणि छिद्रांमधून मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. या घटनेची माहिती मिळताच नाराहेनपिता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या दोन्ही खेळाडूंना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या विकृत आरोपींनी केवळ महिलांचेच नव्हे, तर हॉटेलमधील काही पुरुषांचेही व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सध्या पोलिसांनी हे व्हिडिओ इंटरनेट किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत का, यादिशेने आपला पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून