Night Block : कल्याण-बदलापूर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

कल्याण : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने कल्याण-बदलापूर दरम्यान १ ते ३ मेदरम्यान दोन रात्री विशेष पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ओव्हरहेड उपकरणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी २ मे रोजी पहाटे १.४० ते ३.४० या वेळेत कल्याण-अंबरनाथ दरम्यान, तर ३ मे रोजी १.३० ते ३.३० या वेळेत अंबरनाथ-बदलापूर दरम्यान ब्लॉक राहील. या कालावधीत कल्याण-बदलापूर दरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच काही मेल-एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात येणार असून काही गाड्यांना ठाणे व पनवेल येथे तात्पुरते थांबे देण्यात येणार आहेत. प्रवाशांनीर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


२ मे च्या रात्री, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बीएल ६१ सीएसएमटी -बदलापूर धावेल, तर ब्लॉक नंतरची पहिली लोकल एस४ कर्जत-सीएसएमटी धावेल. त्याचप्रमाणे २ आणि ३ मे च्या रात्री शेवटची लोकल एस ४१ सीएसएमटी-कर्जत असेल आणि त्यानंतर एस४ कर्जत- सीएसएमटी ही पहिली लोकल सुरू होईल. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.


एक्सप्रेस गाड्या वळविणार : रेल्वे प्रशासनानुसार २ मे रोजी धावणारी भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस आणि हैदराबाद-सीएसएमटी सेंसागर एक्सप्रेस या गाड्या कर्जत–पनवेल मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथे थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे स्थानकांवर तात्पुरते थांबे देण्यात येणार आहेत. तसेच उशिराने धावणाऱ्या मेल, एक्सप्रेस व हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये गरजेनुसार बदल किंवा वळवणूक केली जाऊ शकते, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या