राज्यातील भाजपा खासदाराचा पहाटे भीषण अपघात, एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले

पालघर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (MP Dr. Hemant Vishnu Savra) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घोडबंदर रोडवर आज शुक्रवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात खासदारांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे तर या अपघातातून खासदार हेमंत सावरा हे थोडक्यात बचावले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सावरा यांच्या गाडीला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने, डॉ. सावरा यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप आहे. मात्र खासदार सावरा यांच्या गाडीच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. (accident)


दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर


शुक्रवारी सकाळी हा अपघात आला, तेव्हा खासदार सावरा यांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मुंबईच्या लेनवरून एक डंपर येत होता. त्याच डंपरची खासदार सावरा यांच्या गाडीशी थेट धडक झाली. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. सुदैवाने ही टक्कर झाली तेव्हा कारमधील एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या गेल्या आणि मोठं नुकसान टळलं. गाडीतील प्रवासी देखील सुरक्षित राहिले. या अपघाताची माहिती मिळताच, नायगाव पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी दाखल झालं. आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.


पोलिसांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून , त्यामध्ये खासदार सावरा यांच्या गाडीची भीषण अवस्था दिसत आहे


अपघातानंतर डॉ. हेमंत सावरा काय म्हणाले ?


डॉ. हेमंत सावरा यांच्या म्हणण्यानुसार, ते महाराष्ट्र दिनाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ठाण्याहून पालघरला जात होते. मात्र वर्सोवा खाडी पूल (भाईंदर खाडी पूल) ओलांडल्यानंतर लगेचच एका डंपर ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. “डंपर चालकाला आमची गाडी दिसली नाही आणि त्याने आम्हाला धडक दिली.. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


दोन दिवसापूर्वी बजरंग सोनवणेंच्या कारला अपघात


दोन दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली होती. या धडकेत बजरंग सोनवणे सोनवणे यांच्या गाडीची मागील काच फुटली होती. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला होता. खासदार सोनवणे हे बीडहून केजकडे जाताना त्यांचा ताफा मस्साजोगच्या बस स्थानकावर थांबला होता. त्याचवेळी ही घटना घडली होती.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक