Watercut In Mumbai : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भेपर्यंतचा जलबोगदा होणार सुरु

येत्या ५ ते ६ मे रोजी ३० तासांची जोडणी कामांसाठी पाणीकपात


मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे उच्चस्तरीय जलाशय पर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अंतर्गत १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची जोडणी व इतर पूरक कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी तुर्भे उच्चस्तरीय जलाशयाची १८०० मिमी आणि निम्नस्तरीय जलाशयाची १२०० मिमी जलवाहिनी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विषयक सर्व कामे मंगळवार, ५ मे २०२६ रोजी सकाळी १० ते बुधवार, ६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत (एकूण ३० तास) केली जाणार आहेत. या कामादरम्यान शहर विभागातील एफ उत्तर, एफ दक्षिण आणि पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम व एन विभागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.



अमर महल (हेडगेवार उद्यान) ते वडाळा (प्रतीक्षा नगर) आणि पुढे परळ (एएमटी - १) पर्यंत, तसेच अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय (एएमटी - २) आणि पुढे तुर्भे उच्चस्तरीय जलाशय पर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत केले जाणार आहे. या जलबोगद्यामुळे शीव, परळ, शिवडी, वडाळा माटुंगा आदी भागांमधील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होणार आहे.



प्रभावित होणा-या परिसरांचा सविस्‍तर तपशील-


एफ उत्तर विभाग - प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच. एम. मार्ग, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा संकुल


शीव (पूर्व) व शीव (पश्चिम) (बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार)


एफ दक्षिण विभाग –डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटिट मार्ग, एस. एस. राव मार्ग, डॉ. एर्नेस्ट बोर्जेस मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, एन. एम. जी. एस. मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग ,गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, चमार बाग मार्ग, आई माई मेरवानजी मार्ग, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली



एल विभाग -साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नवीन टिळक नगर.


कुरेशी नगर (कसाईवाडा)


हिल मार्ग ,ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, डोंगर परिसर, पाटील गल्ली, गुलमोहर गल्ली, पंचशील नगर .


नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदिर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कुर्ला कारशेड, रेल्वे वसाहत, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर ,एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा वसाहत, समर्थ नगर.


एम पूर्व विभाग  : लल्लूभाई संकुल, कमला रमण नगर, रमण मामा नगर, शिवाजी नगर, लोटस वसाहत, गौतम नगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशी नाका, मानखुर्द बैंगणवाडी, मानखुर्द, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठे नगर, झाकिर हुसेन नगर, देवनार गाव, देवनार वसाहत, न्यू भारत नगर, हशू अडवाणी नगर, नटवर पारेख संकुल


सह्याद्री नगर, वाढवली गाव, बी. ए. आर. सी. वसाहत, कमला रमण नगर, रमण मामा नगर, डम्पिंग सप्लाय .


रफिक नगर, मंडाळा गाव, न्यू मंडाळा, पद्मा नगर, विष्णू नगर, एल. यू. गडकरी मार्ग, आर. एन. ए. पार्क, कुकरेजा इमारती, वाशी नाका, चिता कॅम्प, महाराष्ट्र नगर, म्‍हाडा इमारती, इंडियन ऑइल नगर.


बी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग, एच. पी. सी. एल., बी. पी. सी. एल.


एम पश्चिम विभाग - मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्लू. टी. पाटील मार्ग, मुक्ती नगर, काशिनाथ पाटील वाडी, संतोष नगर, केळकर वाडी, डायमंड गार्डन, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग, एन. बी. पाटील मार्ग, जनार्दन पाटील मार्ग, घाटला गाव, एस. टी. ऍंथोनी मार्ग, चंद्रोदय सोसायटी, एस. जी. बर्वे मार्ग, चरई गाव, बोरला सोसायटी


एम. एस. इमारत क्रमांक १ - ३२


चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमन नगर, भक्ती भवन, चिखल वाडी, समर्थ नगर, बसंत पार्क, सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता बाजार, इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब, राम टेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर वसाहत, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, अण्णाभाऊ साठे मार्ग, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत, मारवली चर्च, आर. सी. मार्ग माहुल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत, वाशी गाव, डी. बी. रियल्टी इमारत, वाडवली, शरद नगर, लक्ष्मी नगर, जनता नगर, वाशी नाका, जिजामाता नगर



भक्ती पार्क येथील सर्व इमारती व एम. एम. आर. डी. ए. इमारत


टिळक नगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर, शेल वसाहत, सहकार नगर, वत्सलाताई नाईक नगर, श्रमजीवी नगर


पी. एल. लोखंडे मार्ग, एकता मित्र मंडळ, मालेकर वाडी, पी. वाय. थोरात मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, जनता नगर, मोतिलाल रहिवाशी संघ, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, सहदीप वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ, नागे वाडी, छेडा नगर


एन विभाग -विद्याविहार (पूर्व), चित्तरंजन नगर, राजावाडी


संपूर्ण घाटकोपर (पूर्व) विभाग, पंत नगर, गारोडिया नगर, लक्ष्मी नगर, बेस्ट वसाहत, नायडू वसाहत, रमाबाई नगर, कामराज नगर, विक्रोळी गाव, गोदरेज ट्रीज


घाटकोपर (पश्चिम) येथील काही परिसर, विद्याविहार (पश्चिम), नारायण नगर, महात्‍मा गांधी मार्ग, लालबहादूर शास्‍त्री मार्गापासून एन. एस. एस. मार्ग ते श्रेयस सिनेमा, कामा गल्ली, किरोळ आणि खलई गाव, पारसी वाडी, चिराग नगर, महेंद्र पार्क, नवीन माणेकलाल .


सर्वोदय रुग्णालय, जीवदया गल्ली, भीम नगर येथील पाण्याच्या टाक्या, नित्यानंद नगर, पवार चाळ, पाटीदार वाडी, गंगावाडी, बरोट वाडी

Comments
Add Comment

Mumbai-Goa Express Way : कोकणकरांचा प्रवास आता होणार सुसाट; महामार्ग लवकरच तयार होण्याच्या मार्गावर

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे आणि बहुतेक जणांच्या नजरा या कोकणाकडे वळल्या आहेत, त्यामुळे गावच्या वाटा

लक्ष द्या ! 1 मे पासून एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये होणार 'हे' मोठे बदल , आताच जाणून घ्या

LPG Cylinder Booking Rule : घरांपासून ते मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र एलपीजीचा वापर केला जातो. मध्य पूर्वेतील

Neelam Gorhe Shivsena : नीलम गोऱ्हेना शिवसेनेतच विरोध? तरीही शिंदेनी दिली उमेदवारी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Watermelon Case : कलिंगड खाऊन मृत्यू की प्लॅन केलेला कट? पायधुनीतील 'त्या' ४ मृत्यूंमागे ७ वर्ष जुनं रहस्य!

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल

1 May Maharashtra Day : १ मे : दादर-शिवाजी पार्क परिसराच्या वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग!

मुंबई : उद्या, शुक्रवार १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनानिमित्त' दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज्य

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.