Shivsena : शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; बच्चू कडूंसह नीलम गोऱ्हे अर्ज भरणार

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)


विधानपरिषदेसाठी एकामागो एक पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात येत होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेले नव्हते अखेर आज शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत दोन्ही नेते विधान भवनात अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहेत, पक्षप्रवेशानंतर आज शिवसेनेकडून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सुरूवातीपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आज या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते आता आपला उमेदवारी अर्ज भरत आहे. (Vidhan Parishad Election 2026)


तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना उमेदवारी (Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026) देण्यात आलेली आहे. जी काँग्रेसला अमान्य आहे. त्यामुळे पुढील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी काँग्रेसची अट असण्याची शक्यता आहे. या अटीवर काँग्रेस या निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ठाकरे गटाला ही अट मान्य झाल्यास काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आहे.


भाजपकडून विधान परिषदेसाठी यांना संधी- (BJP Candidate Vidhan Parishad Election 2026)
सुनील कर्जतकर
माधवी नाईक
संजय भेंडे
विवेक कोल्हे
प्रमोद जठार
प्रज्ञा सातव


राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी यांना संधी- (NCP Ajit Pawar Candidate Vidhan Parishad Election 2026)
झिशान सिद्दीकी

Comments
Add Comment

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित