भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवदर्शनानांवरून परतताना दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर अलवरच्या मौजपूर येथे एका धावत्या कारला आग लागली. या अपघातात पाच जण जिवंत जळाले असून त्यांचा करून अंत झाला आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरअलवरच्या मौजपूर येथे एका धावत्या कारला आग लागून मोठी दुर्घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की पाच जण जिवंत जळाले असून त्यांचा करून अंत झाला आहे. आग विझवल्यानंतर, बचाव पथकांना इर्टिगा कारमध्ये फक्त हाडे सापडली. आग लागताच चालकाने गाडीतून उडी मारली होती. त्यामुळे तो थोडक्यात बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. गंभीर अवस्थेत त्याला जयपूरला हलवण्यात आले आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


कारमधील हे कुटुंब मध्य प्रदेशातील श्योपूरच्या चैनपुरा येथील होते. त्यांच्या मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेवरून परत येत होते. या दरम्यान हा अपघात घडला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा पोलिसांना संशय आहे. ही संपूर्ण घटना काल (30 एप्रिल) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


सीएनजीमुळे आग लागल्याचा संशय
अलवरच्या एएसपी प्रियंका रघुवंशी यांनी सांगितले की, लक्ष्मणगड पोलिसांना कारला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी अंदाजे 15 मिनिटे लागली. सीएनजी (CNG) इंधनामुळे आग वेगाने पसरली आणि त्यामुळे गाडीतील लोकांना बाहेर पडता आले नाही, असा संशय आहे.


मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि एका पुरुषाचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये ठेवलेली फक्त हाडे सापडली आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेतले जातील.


Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल