Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवला आहे.



मस्साजोगमध्ये कोणी मारली बाजी?


बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. मस्साजोगमध्ये २ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांनी निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्नानांची पराकाष्ठा केली. अखेर जनतेने निकाल दिला. नुकताच मस्साजोग सरपंच पदाचा पोटनिवडणुकीच्या निकाल जाहीर झाला त्यात स्वरूपानंद देशमुख हे ९२ मतांनी विजयी झाले आहेत.



बिनविरोध निवडणुकीची विनंती


सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात अण्णांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली होती. गाव पोरकं झालं होत. त्यांनी केलेल्या विकासाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा विचार करून ही निवणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती, परंतु स्वरूपानंद देशमुख निवडणुकीच्या मैदानात उतरले.


२८ एप्रिल रोजा मतदान प्रक्रिया पार पडली होती, या निवडणुकीत गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे गावात ८४ टक्के मतदान पार पडले. स्वरूपानंद देशमुख हे अखेर पर्यंत आपला अर्ज मागे घेण्यास तयार नव्हते. शेवटी ही निवडणुकी अतिशय अटीतटीची झाली असून या निवडणुकीत ९२ मतांनी बाजी मारली.


अश्विनी देशमुख यांना संतोष देशमुख यांच्या पश्चात सहानुभूतीच्या आधारे मत मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता परंतु जनतेच्या मनात काहीतरी वेगळेच होते.



संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढणार


मी याआधी देखील संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईत सामील होतो. इथून पुढे देखील मी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढणार अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी दिली आहे. माझ्यासाठी काम करणाऱ्या तरुण पोरांचा हा विजय आहे. हा स्वाभिमानी जनतेचं अविजय आहे, येत्या काळात गावातील काम कोण करू शकतो? हे जनतेने ओळखले अन् मला विजयी केले अशी प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी विजयानंतर दिली.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून