AI based Exit Poll : प. बंगालमध्ये मुसंडी मारताना आसाममधील भाजपचा गड राहणार अभेद्य!

तामिळनाडूत द्रमुकचा डंका; केरळमध्ये ‘लाल किल्ल्या’च्या बुरुजाला तडे जाणार


नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा आता शांत झाला असून, संपूर्ण देशाचे लक्ष निकालांच्या निकालांकडे लागले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राजकीय विश्लेषकांसोबतच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ने देखील आपले भाकीत वर्तवले आहे. चॅट जीपीटी, जेमिनी आणि ग्रोक यांसारख्या प्रगत एआय मॉडेल्सनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा करिश्मा कायम राहताना दिसत आहे, तर दक्षिण भारतात आणि ईशान्येत सत्तासंघर्षाचे रंजक चित्र समोर आले आहे. पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांनी धक्का दिला असून, काही मोजक्या एजन्सींनी तृणमूल काँग्रेसला तर बहुतांश एजन्सींनी भाजपला बहुमत दिले आहे.


प. बंगालमध्ये भाजप व तृणमूलमध्ये काटे की टक्कर


सर्वात जास्त लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये एआय एक्झिट पोलनुसार 'काटे की टक्कर' पाहायला मिळत असली, तरी सत्ता स्थापनेत तृणमूल काँग्रेस बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. 'चॅट जीपीटी'ने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला १६० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला असून भाजपला ९० ते १२० जागा मिळतील असे म्हटले आहे.पीपुल्स पल्स'ने तृणमूलला १७७ ते १८७ जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर 'प्रजा पोल'ने भाजपला १७७ जागा, तर 'मॅट्रिझ'ने १४६ ते १६१ जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला १५० ते १७५ आणि टीएमसीला ११८ ते १३८ जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना १३०-१४० आणि भाजपाला १५०-१६० जागा दाखविल्या आहेत. दुसरीकडे, 'जेमिनी' एआयने तृणमूलला स्पष्ट बहुमताच्या दिशेने नेले असून त्यांना १७५ ते १९५ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. शहरी भागातील वाढलेले मतदान आणि सत्ताविरोधी लाट ('अँटी इन्कबन्सी') याचा भाजपला फायदा होऊन त्यांच्या जागा ९५ ते ११५ पर्यंत पोहोचतील, असे जेमिनीचे विश्लेषण सांगते. बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांमध्ये मोठी तफावत आहे, ज्यामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. '


तामिळनाडू सत्तेचे समीकरण


तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार असल्याचे चित्र आहे. चॅट जीपीटीने डीएमके आघाडीला ११० ते १३५ जागांचा अंदाज दिला असला, तरी जेमिनी आणि परप्लेक्सिटी यांनी अनुक्रमे १४८ आणि १८५ पर्यंत जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले आहे. अण्णा द्रमुक आघाडीला येथे तगड्या विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे देखील एक्झिट पोल समोर आले आहेत. सत्तेत असलेल्या डीएमके+ (द्रविड मुन्नेत्र कळघम) आघाडीला पुन्हा एकदा बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या 'द्रविड मॉडेल'वर जनतेने विश्वास दाखवल्याचे चित्र दिसत असले तरी, अभिनेता विजय याच्या टीव्हीके (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत मारलेली मुसंडी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.


केरळमध्ये ‘लाल किल्ला’ ढासळणार


केरळमध्ये मात्र राजकीय परंपरेला साजेसा बदल पाहायला मिळू शकतो. चॅट जीपीटी आणि जेमिनी या दोघांनीही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ' आघाडीला सत्तेच्या जवळ नेले आहे. मात्र, 'ग्रोक' ने डाव्यांच्या 'एलडीएफ' आघाडीला झुकते माप दिले असल्याने केरळचा निकाल चुरशीचा ठरणार हे स्पष्ट आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असले तरी, त्यापूर्वी आलेल्या 'ॲक्सिस माय इंडिया' च्या एक्झिट पोलने डाव्यांच्या गोटात अस्वस्थता पसरवली आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली जुनी परंपरा जनता कायम ठेवणार असल्याचे या कलानुसार दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला ७८ ते ९० जागा मिळण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करून इतिहास रचण्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. सत्ताधारी एलडीएफ आघाडीला केवळ ४९ ते ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपने जोरदार प्रयत्न करूनही त्यांना केरळमध्ये केवळ ० ते ३ जागांवर समाधान मानावे लागू शकते. ९ एप्रिल रोजी केरळमधील सर्व १४० जागांसाठी मतदान झाले होते. यावेळी ७८.२७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असून, १९७७ नंतरचे हे दुसरे सर्वात मोठे मतदान ठरले आहे. या प्रचंड मतदानाचा फायदा थेट विरोधी पक्ष असलेल्या यूडीएफ ला मिळताना दिसत आहे. विशेषतः महिला मतदारांचा कल सत्तांतराच्या बाजूने असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ!


ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखणे काँग्रेसला कठीण जाणार असल्याचे एआयचे सर्वच पोल्स सांगत आहेत. चॅट जीपीटीने ७५ ते ९५, तर जेमिनीने ८५ ते ९५ जागा भाजप आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विकासकामे आणि हिंदुत्वाचा अजेंडा आसाममध्ये भाजपसाठी सत्तेचे हॅट्ट्रीक मिळवून देताना दिसत आहे.


‘एक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असून, काँग्रेस आघाडी मागे पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आसाम विधानसभा निवडणुकीनंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले असून, ‘एक्सिस माय इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ८८ ते १०० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘काँग्रेस+’ आघाडीला २४ ते ३६ जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आघाडीत काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे २२ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. रायजोर दल, एजेपी, सीपीआय(एम) आणि इतर मित्रपक्षांना अत्यल्प जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना ० ते ३ जागा मिळू शकतात.


मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला मिळालेल्या या संभाव्य यशामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एक्झिट पोल समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांकडून मात्र अधिकृत निकालाची प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली जात आहे.

Comments
Add Comment

Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे

Jai Konkan : भाजपच्या तेजिंदर सिंग तिवानाने महापालिकेत लावला जय कोकणचा नारा

अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मालवणी भाषेतून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पिय भाषणात

AC Local : मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या संख्येत वाढ, जाणून घ्या पनवेल - CSMT मार्गावर किती एसी लोकल धावणार ?

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-पनवेल हार्बर

Baramati and Rahuri : बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले एवढ्या मताधिक्क्याने जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

पुणे/अहिल्यानगर : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा