Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित सुरू करण्यात आलेली जलयात्रा श्रीक्षेत्र महेश्वर येथे पोहचणार आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन मंत्री जयकुमार रावल मध्यप्रदेशचे खासदार सुमेरसिंह सोळंकी,खा.गजेंद्रसिंह पटेल खा.ज्ञानेश्वर पाटील खा.रामराव वडकुते आ.राजकुमार मेव आ.बालकृष्ण पाटीदार आ.गोपीचंद पडळकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.


जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे असा मुख्य उद्देश घेवून निघालेली जलयात्रा नासिक अहील्यानगर छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव धुळे जिलह्यातून मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.यात्रेचे सर्व ठिकाणी झालेले उत्साहपूर्ण स्वागत लोकांनी दाखवलेला सहभाग यामुळे जलयात्रा लोकचळवळ झाल्याचे समाधान आहेमहेश्वर येथे यात्रेच्या सांगता समारंभाची भव्य तयारी विभागाने केली असून सांगता समारंभ भव्य दिव्य आणि सांसकृतिक परंपरेला साजेसा होईल असे नियोजन करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक