Nitesh Rane : दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळाने घेतली मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची भेट

मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळामध्ये आज जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी व्यापारवृद्धी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशांना लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि विद्यमान व्यापारी संबंध विचारात घेता, तंत्रज्ञान देवाण घेवाणचा योग्य वापर करून आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करता येतील, असा विश्वास श्री. राणे यांनी यावेळी व्यक्त केला.





दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो. अनिल सुकलाल यांच्यासह सेड्रिक सी. क्रॉली व गेडियन लाबाने यांनी मंत्री श्री राणे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य आहे. बंदर विकासासाठी राज्य सरकारने आवश्यक धोरणे वेळोवेळी राबविली आहेत. बंदरांचा विस्तार, आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्था, डिजिटायझेशन आणि सागरी पायाभूत सुविधांच्या उभारणीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विविध योजनांचा लाभ मिळू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. जलमार्ग आणि जलवाहतुकीच्या विकासावर भर देण्यात येत असून या माध्यमातून वाहतूक खर्चात बचत होऊन रस्ते वाहतुकीस जल वाहतूक सक्षम पर्याय निर्माण होणार आहे.


मंत्री राणे म्हणाले की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील व्यापार व औद्योगिक सहकार्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत व्यावसायिक संबंध असून, सागरी आणि मत्स्य क्षेत्रातही ते पुढील काळात अधिक दृढ करण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के